व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्ह्यू वन्स’ नावाचे नवीन फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. अजून सगळ्या वापरकर्त्यांना हे फिचर उपलब्ध झाले नसले तरी काहींना हे फिचर आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांनसाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवीन बदल घडवत असतो. हे बदल घडवत असताना किंवा नवीन अपडेट आणत असताना त्या वेळचेच्या गरजेचा आणि वापरकर्त्यांना काय आवडेल याचा विचार केला जातो. वेळोवेळी केल्या जाणाऱ्या या अपडेटबद्दल सोशल मीडियावरती नेहमीच चर्चासुद्धा रंगते. काय आहे हे नवीन फिचर आणि कसे काम करते हे फिचर याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे हे नवीन फिचर?

व्हॉट्सअ‍ॅपने वेब / डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी नवीन २.२१२६.११ हे वर्जन आणलं आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्ह्यू वन्स’ (View Once) हे फीचर आणण्यास सुरवात केली आहे. या फिचरनुसार वापरकर्त्यांद्वारे पाठविलेले फोटो आणि व्हिडिओ रिसीव्हने पहिल्या नंतर ते आपोआपच डिलीट होतील. तुमचं व्हॉट्सअ‍ॅप झालं असेल किंवा तुम्ही अपडेट केलं असेल तर तुम्हाला चॅटमध्ये फोटो / व्हिडिओ पाठविताना ‘व्ह्यू वन्स’ चा ऑप्शन दिसेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

डिसअपियरिंग मेसेज आणि व्ह्यू वन्स हे फिचर सेमच आहे?

या नवीनफिचरबद्दल काही लोकांच असं म्हणणे आहे की गेल्या वर्षी सुरु झालेल्या डिसअपियरिंग मेसेज प्रमाणेच हे नवीन फिचर आहे. फक्त त्यामध्ये मेसे ७ दिवसांनी स्वतःहून डिलीट होतो. परंतु या फिचरमध्ये एकदा बघितलेला फोटो किंवा व्हिडिओ लगेच स्वतःहून डिलीट होतात.

Archive मेसेजमध्येही मोठा बदल

याशिवाय वापरकर्त्यांनासाठी आणखी एक नवीन फीचर New Archive हे करण्यात आले आहे. यामध्ये म्हणजे वापरकरते संग्रहित चॅट अर्थात गप्पांमध्ये नवीन मेसेज आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार नाही. आणि ते चॅट तसेच Archive मेसेजमध्ये राहील. तुम्हाला Archive चा ऑप्शन आता चॅट बॉक्सच्या वरतीच दिसेल.तुम्हाला हे फीचर्स अजूनही दिसत नसतील तर काळजीचे कारण नाही. कारण व्हॉट्सअॅप हळूहळू सगळ्याच वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे.
या दोन फीचर्स शिवाय In-App नोटिफिकेशनला सुद्धा लवकरच पुन्हा डिझाइन करणार आहे.

 

Story img Loader