फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग वर्टिकल व्हॉट्सअॅपने भारतातील सर्व वापरकर्त्यांसाठी पेमेंट सेवा सुरू केली आहे. यासाठी व्हॉट्सअॅपने नवीन अपडेटमध्ये चॅट स्पेसही बदलेली आहे. यासह तुम्हाला आता UPI पेमेंट व्हॉट्सअॅपवरच वापरता येईल. वापरकर्त्यासाठी पेमेंट आणि व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे बदल केले आहेत. आपण ते कसे वापरू शकतो आणि त्याची इतर वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊयात.

मर्यादित वापरकर्त्यांसह नोव्हेंबरमध्ये झाली सुरुवात

फेसबुकने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा सुरू केली. मग ही सेवा फक्त मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यानंतर, जून २०२१ मध्ये, कंपनीने आपली व्याप्ती वाढवली आणि व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा प्रत्येक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आलीय. नवीन अपडेटनंतर आता भारतातील सर्व व्हॉट्सअॅप वापरकर्ते पेमेंट सेवेचा लाभ घेऊ शकतात.

Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?

नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअॅप पेमेंट करणे सोपे झाले

या अपडेटपूर्वी व्हॉट्सअॅप पेमेंट वापरणे तुलनेने कठीण होते. ते वापरण्यासाठी एखाद्याला चॅट स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील तीन ठिपक्यांवर क्लिक करून अधिक पर्याय निवडावा लागायचे. त्यानंतर पेमेंटचा पर्याय देण्यात आला होता. मात्र आता व्हॉट्सअॅपने चॅट स्पेसमध्येच पेमेंटची सुविधा दिली आहे. यासाठी तुम्हाला टायपिंग बारच्या डाव्या बाजूला संलग्नक पर्यायाच्या पुढे एक रुपयाचे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावर क्लिक करून व्हॉट्सअॅप पेमेंट करता येईल.

बँक खाते असे जोडा

जेव्हा तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला बँक खाते जोडण्यास सांगितले जाईल. येथे तुम्हाला सांगितले जाईल की व्हॉट्सअॅपवर पैसे मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तुम्हाला बँक खाते जोडावे लागेल. यात तुम्हाला तुमच्या संपर्क यादीत किती लोकं व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा वापरत आहेत हे देखील कळेल. तळाशी तुम्हाला गेट स्टार्ट बटण दिसेल, ज्यावर क्लिक करून व्हॉट्सअॅपमध्ये बँक खाते जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

वेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअॅप चालवणार्‍या व्यक्तींना या समस्या येतील

जी लोकं कॉलिंग करता तसेच इतर कामांसाठी वेगळा नंबर वापरतात आणि व्हॉट्सअॅप वापरण्याकरिता दूसरा नंबर वापरतात त्यांना या सेवेचा लाभ घेण्यास अडचणी येऊ शकतात. व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा फक्त बँक खात्याशी जोडलेल्या नंबरसाठी आहे, जे काहीआहेत. जर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या नंबरवरून व्हॉट्सअॅप चालवत नाही, तर तुम्हाला व्हॉट्सअॅप पेमेंट सेवेचा लाभ घेता येणार नाही. याकरिता तुम्हाला बँक खात्याशी जोडलेल्या नंबरवरून व्हॉट्सअॅप चालवावे लागेल.

व्हॉट्सअॅप पेमेंट्स संरक्षण

एकदा तुम्ही बँक खाते जोडण्यासाठी पुढील स्टेपवर गेलात की तुम्हाला स्पष्टीकरण देण्यात येईल. तसेच व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही केलेले सर्व पेमेंट वैयक्तिक यूपीआय पिनसह सुरक्षित असणार आहेत. या दरम्यान व्हॉट्सअॅप ना तुमचा यूपीआय पिन संचयित करतो आणि नाही तुमचा पूर्ण बँक खाते क्रमांक. व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा ही दोन बँकांमधील पैशांच्या व्यवहारावर आधारित आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने नियंत्रित केलेले UPI वापरले जाणार आहे. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप पेमेंटच्या व्हाट्सएप अटी आणि गोपनीयता धोरणाशी सहमत व्हावे लागेल तसेच पेमेंट प्रोवायडरच्या अटी आणि गोपनीयता धोरणातून संमती घेणे देखील आवश्यक आहे.