07 June 2020

News Flash

दि. १५ ते २१ मे २०१५

मेष काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचा झपाटा जरी चांगला असला तरी कोणालाही घाईगडबडीमध्ये आश्वासन देऊ

| May 15, 2015 01:02 am

01vijayमेष काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचा झपाटा जरी चांगला असला तरी कोणालाही घाईगडबडीमध्ये आश्वासन देऊ नका. पशाचा व्यवहार करण्यापूर्वी अतिविश्वास टाळा. नोकरीमध्ये तुमचा कामाचा उत्साह बघून वरिष्ठ एखादी वेगळी जबाबदारी तुमच्या गळ्यात टाकतील. त्यामानाने मिळणाऱ्या सवलती कमीच असतील. घरामध्ये पसे खर्च करताना तुम्हाला भान राहणार नाही. जोडीदाराच्या हट्टामुळे तुमचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

वृषभ तुमच्यामधील जिद्द आणि रसिकता या दोन्हीचे दर्शन घडवून आणणारे हे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगाशी निगडित जी महत्त्वाची कामे विनाकारण लोंबकळत पडलेली होती त्यांना आता गती येईल. एखादे नवीन आणि मोठे काम मिळेल. नोकरीमध्ये नवीन टेबलावर किंवा नवीन जागी कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे सर्व अवघड वाटेल, पण एक-दोन आठवडय़ांत तुम्ही हुरळून जाल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रिय व्यक्तींची गाठभेट होईल. स्वत:च्या आवडीनिवडीनुसार खरेदी कराल.

मिथुन ग्रहमान तुमचे खर्च वाढवणारे आहे. व्यापार-उद्योगात उत्पन्नाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे तुमच्या मनात अनेक तरंग उठतील. व्यवसायासाठी जादा भांडवल किंवा कर्ज उपलब्ध होईल, पण जे पसे हातात पडतील ते कदाचित तुम्ही व्यक्तिगत कारणाकरिता खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये आळस किंवा चुका झाल्या तर वरिष्ठांना तोंडसुख घेण्याची संधी मिळेल. बेकार व्यक्तींना एखादी संधी लांबल्यामुळे थोडीशी निराशा येईल. घरामध्ये पूर्वी ठरलेले समारंभ पार पडतील.

कर्क ग्रहमान संमिश्र आहे. आपल्या पद्धतीने आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याची तुमच्यामधली ऊर्मी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. व्यवसाय-उद्योगात भरपूर काम होईल. पसे चांगले मिळाले याचा आनंद घ्यायचा तुम्ही ठरवाल, पण लगेचच ‘लक्ष्मी चंचल असते’ याचा प्रत्यय येईल. नोकरीमध्ये संस्थेचे काम करता करता स्वत:ची एखादी सुप्त इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्याल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. घरामध्ये मौजमस्तीचा माहोल असेल. पाहुण्यांमुळे जीवनात रंगत येईल.

सिंह ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी सभोवतालच्या व्यक्ती एखादे अवघड काम तुमच्यावर सोपवतील. तुम्ही त्यात शक्ती आणि युक्तीच्या जोरावर चांगला मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगात एखादा प्रश्न दीर्घकाळ लोंबकळत पडलेला असेल तर त्या वेळी त्यामध्ये ‘शेंडी तुटो वा पारंबी’ असा पवित्रा ठेवून तो प्रश्न निकालात काढाल. नोकरीमध्ये ज्या कामातून महत्त्व वाढणार आहे अशा कामाला महत्त्व द्याल. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक मतभेद होतील किंवा स्वास्थ्याविषयी चिंता वाढेल.

कन्या प्रत्येक कामाच्या बाबतीत तुम्ही आता प्रचंड उत्साही आणि आशावादी दिसाल. व्यापार-उद्योगात नवीन करार किंवा बोलणी करण्यापूर्वी त्यातील अटी आणि शर्ती काय आहेत याचा अभ्यास केल्याशिवाय सह्य़ा करू नका. नेहमीच्या कामात उत्तम गती असल्यामुळे तुम्ही एकदम गडबडीत दिसाल. नोकरीमध्ये नवीन कामात रस घ्याल, पण जुन्या कामाचा कंटाळा कराल. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरत नसेल तर त्यामध्ये तुमचा पुढाकार उपयोगी पडेल. प्रवासाचे बेत आधी ठरले असतील तर ते कार्यान्वित होतील.

तूळ ‘रुपयाभोवती फिरते दुनिया’ ही गोष्ट जरी खरी असली तरी ती तुम्हाला लवकर पटत नाही. एखाद्या निमित्ताने त्याची तुम्हाला प्रचीती येईल. व्यापार-उद्योगात नवीन कल्पनांचा तुमच्याकडे तोटा नसेल, पण या योजना आíथकदृष्टय़ा खर्चीक असल्यामुळे त्या लांबविणे तुम्हाला भाग पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काम तुमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतील. त्याचा तुम्हाला राग येईल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल. पण एखाद्या जुन्या प्रश्नावरून जोडीदाराशी तुमचे खटके उडतील.

वृश्चिक अनेक कल्पना तुमच्या मनामध्ये असतील, पण पशाचा विचार मनात आला की तुम्ही एक पाऊल मागे घ्याल. व्यापार-उद्योगात एखादे जिकिरीचे काम तुमच्यामागे लागेल. हे काम तातडीचे असल्यामुळे त्यामध्ये आळस करून चालणार नाही. नवीन मत्री कराराचे प्रस्ताव तुमच्यापुढे येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अनवधानाने जे काम तुम्ही विसरला होतात त्याची वरिष्ठ आठवण करून देतील. घरामध्ये सगळ्यांचा मूड मौजमजेचा असेल. घरगुती समारंभाकरिता वेळ व पसे राखून ठेवावे लागतील.

धनु तुमच्या दृष्टीने जी व्यावसायिक आणि व्यक्तिगत कामे महत्त्वाची आहेत ती तातडीने हातात घेऊन त्यांचा फडशा पाडाल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांची तुम्हाला नेहमीच भीती वाटते. आणि त्यांची कॉपी करण्याचा तुम्ही प्रयत्न करता, पण आता ते टाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कामात तत्पर राहा, नाही तर तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध कागाळ्या करण्याची शक्यता आहे. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारातील तफावत प्रकर्षांने जाणवेल. हातामध्ये जास्त पसे नसूनही एखादी महागडी खरेदी करावी लागेल.

मकर सकृत्दर्शनी जी कामे अगदी सहज आणि सोपी वाटली होती त्याला वेगळी कलाटणी मिळाल्याने निर्माण होणारे प्रश्न निपटून काढण्यात वेळ आणि पसे खर्च होतील. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला पसे देण्याचे मान्य केले होते, त्यांनी आयत्या वेळी त्यांचा शब्द फिरवतील. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या फायद्याकरिता तुमची एखादी जबाबदारी वाढवतील. मिळालेल्या अधिकाराचा पशांकरिता वापर करू नका. घरामध्ये न सुटलेल्या प्रश्नावर तुम्ही चांगला तोडगा शोधाल. त्याचे सगळ्यांना कौतुक वाटेल.

कुंभ तुमची इच्छा असो वा नसो व्यावसायिक कामातून लक्ष काढून तुम्हाला तुमच्या कौटुंबिक गरजांना महत्त्व द्यावे लागेल. व्यापार-उद्योगात इतरांवर जास्त विसंबून न राहता तुमची कामे तुम्हालाच केलेली आवडतात. आता मात्र हाताखालच्या व्यक्तींवर अवलंबून राहावे लागेल. नोकरीमधल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे काम असेल तर त्यामध्ये तुम्ही रस घ्याल. हाताखालच्या व्यक्तींकडून मात्र बऱ्याच अपेक्षा ठेवाल. घरामध्ये एखादा शुभसमारंभ ठरला असेल तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल.

मीन एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कोणाशी चर्चा किंवा वाटाघाटी करायच्या असतील तर अशा कामाला प्राधान्य द्या. व्यापार-उद्योगातील कामकाज गतिमान होईल. जे काम तुम्ही करत आहात त्याला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ अवघड कामे मोठय़ा विश्वासाने तुमच्याकरिता राखून ठेवतील. घरामध्ये एखाद्या मुद्दय़ावर तुम्ही स्वत:च्या मतांवर अडून बसाल, पण नंतर इतरांना तुमचे म्हणणे योग्य होते असे लक्षात येईल.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2015 1:02 am

Web Title: astrology 10
टॅग Astrology,Horoscope
Next Stories
1 दि. ८ ते १४ मे २०१५
2 दि. १ ते ७ मे २०१५
3 दि. २४ ते ३० एप्रिल २०१५
Just Now!
X