21 October 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १३ ते १९ मार्च २०२०

चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता.

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता. शांत डोक्याने विचार करा. नोकरी-व्यवसायात कामाचा उरक वाढेल. मोठे व महत्त्वाचे प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्ग चांगली साथ देईल. अर्थार्जनाच्या आणखी काही वाटा चोखाळाल. धाडस व उत्साह दाखवाल. अविचाराने आíथक गुंतवणूक नको. जोडीदाराचे रुसवे-फुगवे प्रेमाने दूर करा. रक्ताभिसरण संस्थेच्या तक्रारी निर्माण होतील.

वृषभ चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे गणित, अर्थशास्त्र, हिशेब, व्यवस्थापन या क्षेत्रांत प्रगतिकारक घटना घडतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या शब्दाचा मान राखून आपली मते प्रभावीपणे मांडाल. संस्थेच्या हिताचा निर्णय घ्याल. सहकारी वर्ग कौतुकास्पद काम करेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडचणींमुळे त्याची चिडचिड वाढेल. त्याची मन:स्थिती सांभाळावी लागेल. उष्णतेपासून डोळ्यांची काळजी घ्या. औषधोपचार घ्यावेत.

मिथुन रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे कामाला गती मिळेल. हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. कीर्ती पसरेल , मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची सहमती मिळवाल. आपल्या विषयाचे उत्तम सादरीकरण कराल. ज्येष्ठ सहकारी वर्गाच्या अनुभवातून व्यावहारिक गोष्टी शिकाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचा मान वाढेल. यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मूत्राशयाचे आरोग्य सांभाळावे. योगासने करावीत.

कर्क चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या आवडीनिवडी जपाल. मन आनंदी राहील. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. त्यांना सहकार्य कराल. नोकरी-व्यवसायात नव्या कल्पना मांडाल. हिरिरीने अधिकाधिक जबाबदाऱ्या पेलाल. सहकारी वर्ग अपेक्षित मदत करेल. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर येईल. मानसिक स्थिती स्थिरावल्यामुळे आजार बरे होतील.

सिंह चंद्र-बुधाच्या सम सप्तम योगामुळे भावना व व्यवहार यातील संघर्षांला सामोरे जावे लागेल. विवेकबुद्धीचा उपयोग करून अंतिम निर्णय घ्यावा. नोकरी-व्यवसायात योग्य व्यवहार सांभाळाल. नव्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास सार्थकी ठरवाल. सहकारी वर्ग तंत्रज्ञानाची बाजू सांभाळेल. जोडीदाराचे  अंदाज खरे ठरतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. ज्येष्ठ मंडळींचा सहवास लाभेल. हाडे, सांधे यांची काळजी घ्यावी.

कन्या चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे उत्साहाच्या भरात धावपळ, दगदग अधिक होईल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा वापर करून वेळप्रसंगी धाक दाखवाल. शिस्तीचा अवलंब कराल. सहकारी वर्गाकडून कामे करवून घ्याल. जोडीदार कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पेलेल. त्याच्या या महत्त्वाच्या कामगिरीची जाण ठेवाल. मानसिक ताण जाणवेल. छंदात मन रमवाल. पाठीचा मणका दुखावल्यास त्वरित उपचार करावे लागतील.

तूळ गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. अचानक मदत मिळेल. आप्तेष्टांचे मार्गदर्शन कामी येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. कामात हयगय होऊ देऊ नका. सहकारी वर्गाच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्याल. कौटुंबिक वातावरणाला शिस्तीची चौकट ठोकाल. काटकसरीने वागाल. जोडीदार  आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाकेल. मांडय़ा, पोटऱ्या व पावले दुखणे यांची शक्यता! योग्य वेळी विश्रांती घ्यावी.

वृश्चिक रवी-प्लुटोच्या लाभ योगामुळे गटाचे नेतृत्व कराल. विचार ठामपणे मांडाल. कमजोर घटकांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. सहकारी वर्गाकडून नव्या योजना अमलात आणाल. जोडीदाराच्या समस्या समजून घेणे आवश्यक! कुटुंब सदस्यांकडून आनंदवार्ता समजतील. यश, कीर्ती वाढेल. वातावरणातील उष्णतेमुळे पित्ताचा त्रास होईल. आहार, विहारात बदल करणे आवश्यक!

धनू मंगळ-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे धाडसी विचार व भावना यात संघर्ष होईल. काही गोष्टी मनाविरुद्ध स्वीकाराव्या लागतील. स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा पर्यायी मार्ग शोधावा. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. नव्या ओळखी होतील. सहकारी वर्गाची विशेष मदत होईल. बौद्धिक खेळात बाजी माराल. जोडीदार लहानसहान मुद्दय़ांवरून वाद घालेल. कायद्यावर बोट ठेवेल. मनावर ताबा ठेवा. मूत्रमार्गाची जळजळ होईल. उष्णतेचा त्रास वाढेल.

मकर रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. अडचणींवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायातील निर्णय अचानक बदलावा लागेल. सहकारी वर्गाला कामे पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. जोडीदार विचारपूर्वक निर्णय घेईल. कामात सातत्य राखेल. नातेवाईकांमधील गरसमज दूर होतील. कुटुंबातील वादविवाद चच्रेने मिटवाल. उष्णतेमुळे गळू, पुळ्या यांचा त्रास संभवतो. त्वचाविकारावर उपाय करा.

कुंभ चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे व्यवहारचातुर्य दाखवाल. भावनांवर विचारांचा विजय मिळवाल. बुद्धिमत्तेची झलक दाखवण्याची संधी लाभेल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना उत्तेजित करावे लागेल. जबाबदारीची जाणीव करून द्याल. जोडीदाराला मानसन्मान मिळेल. त्याचा आपणास अभिमान वाटेल. संपूर्ण चौरस आहार ग्रहण करून आरोग्य चांगले ठेवाल.

मीन गुरू-चंद्राच्या युतीयोगामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. गुरुजनांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्याल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ-वरिष्ठांचे पाठबळ लाभेल. जुन्या परिचयातील लोकांच्या मदतीमुळे लांबणीवर पडलेली कामे गतिमान होतील. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे अडचणीतून मार्ग निघेल.  डोळे तळावणे, चुरचुरणे यांकडे दुर्लक्ष करू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 1:01 am

Web Title: astrology date 13 to 19 march 2020
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ६ ते १२ मार्च २०२०
2 राशिभविष्य : दि. २८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२०
3 राशिभविष्य : दि. २१ ते २७ फेब्रुवारी २०२०
Just Now!
X