15 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १० ते १६ जानेवारी २०२०

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका चांगली पेलाल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका चांगली पेलाल. योग्य मार्गदर्शन कराल. नोकरी-व्यवसायात धर्याने पुढे जाल. सहकारी वर्गाला मदत कराल. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. नव्या योजनांचा आधी सखोलपणे अभ्यास करावा. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. वारंवार उद्भणाऱ्या पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. वैद्यकीय उपचार आवश्यक!

वृषभ चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे चंद्राच्या चतन्याला मंगळाच्या उत्साहाची साथ लाभेल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी व्यवसायात उत्स्फूर्त भाषण कराल. आपले मुद्दे प्रभावपणे मांडाल. सहकारी वर्गाच्या मागे लागून कामे करून घ्यावी लागतील. जोडीदाराची पत वाढेल. त्याच्या कार्यक्षेत्रात तो चमकेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. ज्येष्ठ मंडळींचे मन जपा. उत्सर्जन मार्गात अडथळे येतील.

मिथुन रवी-चंद्राच्या समसप्तम योगामुळे ग्रहणशीलता व प्राणशक्ती वाढेल. नोकरी व्यवसायात उत्साहाने नवे करार, नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. सहकारी वर्ग मदत करेल. त्यांच्या समस्या आपण समजून घ्याल. जोडीदार त्याच्या कार्यात व्यस्त असेल. सामाजिक कामे आवडीने करेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आहे त्या परिस्थितीतून योग्य मार्ग शोधाल. मूळव्याध, भिगदर यांसारख्या किचकट त्रासांवर औषधोपचार करा.

कर्क चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे धाडस व उत्साह वाढेल. आप्तेष्टांच्या पाठबळामुळे जीवनातील महत्त्वाचे पाऊल पुढे टाकाल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाचा ठसा उमटवाल. सहकारी वर्गाकडून परदेशासंबंधीत कामे करून घ्याल. जोडीदाराला भावनिक आधार द्याल. त्याच्या समस्यांवर उपाय शोधाल. कुटुंब सदस्य प्रवासाला निघतील. अंगदुखी, मांडय़ा भरून येणे  ही लक्षणे आढळल्यास योग्य विश्रांती घ्यावी.

सिंह गुरु-चंद्राच्या नवपंचम योगामुळे अडचणीत असलेल्या संस्थेला मदत कराल. नोकरी-व्यवसायात सर्व यंत्रणा ताब्यात ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. सहकारी वर्गाच्या अडीअडचणींवर विचारविनिमय करून योग्य निर्णय घ्याल. जोडीदाच्या प्रेमाला साजेशी साथ द्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी असेल. सर्व मिळून लहानसा बेत आखाल. कोरडय़ा त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

कन्या रवी-बुधाच्या युतियोगामुळे विद्याव्यासंग व बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात प्रसंगावधान राखून वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्गाची बाजू समजून घ्याल. जोडीदारावर आपल्या अष्टावधानी वृत्तीची छाप पाडाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. नातेवाईकांना मदत कराल. पोटऱ्यांमध्ये पेटके येतील. शारीरिक श्रम अधिक होतील.

तूळ चंद्र-नेपच्युनच्या नवपंचम योगामुळे बुद्धिमत्तेचा नवा कंगोरा प्रदíशत कराल. नोकरी-व्यवसायात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवाल. कामानिमित्त प्रवास योग संभवतो. सहकारी वर्गाची योग्य साथ मिळेल. जोडीदाराच्या विचारांमध्ये जरी वेगळेपणा असला तरी नात्यातील बंध मजबूत राहतील. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी कराल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक!

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा त्रास होईल. उत्साहाच्या भरात अविचाराने कोणतेही पाऊल उचलू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे कृती कराल. सहकारी वर्ग आपल्या हिताच्या गोष्टी सुचवेल. इतरांच्या भावनांचा मान ठेवाल. जोडीदार प्रापंचिक जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. फार  विचार करू नका. डोकं शांत ठेवा. नुसते अंदाज बांधू नका.

धनू  रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे केलेल्या कष्टाचे चीज होईल. मित्रमंडळींबरोबर उदारमतवादी वृत्तीने रहाल. नोकरी-व्यवसायात  हाती घेतलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी अधिक काळ लागेल. सहकारी वर्गाकडून नवे करार मान्य करून घ्याल. जोडीदाराचा मान वाढेल. आपल्या कार्यात तो अधिक व्यस्त असेल. अधिकार पद भूषवेल. कुटुंबातील सदस्याला एखादा पुरस्कार मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दंड, खांदे दुखतील.

मकर चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे जिद्द व चिकाटी वाढेल. मंगळाच्या धाडसाला चंद्राच्या यशाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात स्पष्टपणे बोलण्याचा फायदा होईल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्ग आपल्या बाजूने उभा राहील. आपले मनोबल वाढवेल. जोडीदाराचा एखादा मुद्दा पटणार नाही. तूर्तास तरी त्यावर चर्चा नको. घरासाठी आधुनिक सुविधेची वस्तू खरेदी कराल. मित्राची मदत कराल. स्कीन अ‍ॅलर्जीची शक्यता आहे.

कुंभ शुक्र व चंद्र या दोन स्त्री ग्रहांच्या समसप्तम योगामुळे चोखंदळपणे खरेदी कराल. परिस्थितीचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. अडचणींशी सामना करणाऱ्या सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. जोडीदाराच्या बाणेदारपणामुळे काही रखडलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जे ठरवाल ते निश्चयाने पूर्ण कराल. परंतु त्यासाठी अट्टहास नको. मन:शांती ढासळू देऊ नका.

मीन चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे घाईघाईने निर्णय घेण्याची वेळ येईल. पण अविचाराने पाऊल पुढे टाकू नका. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेली कामे रखडतील. सहकारी वर्गाकडून मिळालेली माहिती पुन्हा तपासून घ्यावी लागेल. जोडीदाराला आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. पाठीचे दुखणे तोंड वर काढेल. योग्य काळजी घ्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 1:00 am

Web Title: astrology from 10th to 16th january 2020
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ३ ते ९ जानेवारी २०२०
2 राशिभविष्य : दि. २७ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०
3 राशिभविष्य : दि. २० ते २६ डिसेंबर
Just Now!
X