28 October 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १६ ते २२ ऑक्टोबर २०२०

गुरू-शुक्राच्या नवपंचम योगामुळे ज्ञान आणि कला यांचा अनोखा मिलाप होईल.

संग्रहित छायाचित्र

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुरू-शुक्राच्या नवपंचम योगामुळे ज्ञान आणि कला यांचा अनोखा मिलाप होईल. सामाजिक कार्याला हातभार लावाल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेले प्रकल्प तडीस न्याल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या मदतीने मोठी जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराच्या गुणवत्तेचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरणात ताणतणाव वाढेल. सबुरीने घ्यावे. आपले निर्णय इतरांवर लादू नका. ओटीपोट, माकडहाडाचे दुखणे बळावेल. हलका व्यायाम आवश्यक!

वृषभ शुक्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे एखाद्या गोष्टीचा कलात्मक दृष्टिकोनातून विचार कराल. नित्यनेमाच्या बाबींमध्ये थोडासा फेरफार करून त्यातील रस वाढवाल. नोकरी-व्यवसायात नव्या ओळखी होतील. आपल्या विचारांची छाप पाडाल. वरिष्ठांचे मत ऐकून घेऊन त्यात काही बदल सुचवाल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. एकमेकांशी सूर जुळतील. जोडीदाराच्या कामाचा वेग वाढेल. नव्या जबाबदाऱ्यांचा भारही वाढेल. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.

मिथुन चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे नव्या कल्पनांना वाव मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. ज्येष्ठ मंडळींचा पाठिंबा मिळेल. नोकरी-व्यवसायात अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. सहकारी वर्गाच्या समस्या जाणून घ्याल. जोडीदाराला आपल्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त अधिकार मिळतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांच्या समस्यांवर उपाय सापडतील. रक्ताभिसरण संस्थेत अडचणी निर्माण झाल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

कर्क चंद्र-शनीच्या लाभयोगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला शनीच्या सातत्याची आणि चिकाटीची साथ मिळेल. अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवाल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन कराल. सहकारी वर्गाला न्याय मिळवून द्याल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंब सदस्यांची चांगली साथ मिळेल. त्यांच्या सहकार्याने मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडाल. ताणतणावातून बाहेर पडा.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे आत्मस्फूर्तीने उत्तम लेखन कराल. आपले भाषण प्रभावी आणि अनेकांना मार्गदर्शक ठरेल. नोकरी-व्यवसायात विषयाच्या मुद्देसूद मांडणीची वाहवा होईल. वरिष्ठांच्या मताचा आदर कराल. संस्थेचे हित साधाल. सहकारी वर्गाच्या मदतीचा लाभ घ्याल. गरजवंताला काम मिळवून द्याल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. त्याला वेळ देणे आवश्यक! मान आणि पाठीचा वरचा भाग यांची विशेष काळजी घ्यावी.

कन्या चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे अडचणीतूनही मार्ग काढाल. उत्साहाच्या भरात घाईघाईने निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात कामाचा मोबदला मनाप्रमाणे मिळणार नाही. सहकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराचा व्यवहारी दृष्टिकोन, सल्ला उपयोगी ठरेल. नातेसंबंधही जपले जातील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानी राहील. नाहक चिडचिड टाळावी. रक्ताभिसरण आणि श्वसनसंस्थेची विशेष काळजी घ्यावी. जुने विकार बळावतील.

तूळ बुद्धिवादी आणि कर्तव्यतत्पर अशा आपल्या राशीतील चंद्र-बुधाच्या युतीयोगामुळे आपल्या स्मरणशक्तीचा योग्य उपयोग कराल. हुशारी आणि नेमकेपणा वाखाणण्याजोगा असेल. वरिष्ठांच्या हुकमाची यथायोग्य अंमलबजावणी कराल. सहकारी वर्गाकडून चांगली साथ मिळेल. काही मुद्दे आपल्या लक्षात आणून देतील. जोडीदाराच्या पुढय़ात अनेक पेच उभे राहतील. त्याला आधाराची गरज भासेल. उष्णतेमुळे पित्त आणि डोकेदुखी बळावेल. औषधोपचार घ्यावेत.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे आपल्या उत्साही वृत्तीनुसार सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवाल. सहकारी वर्गाची अरेरावी मोडून काढाल. सतर्कतेमुळे नुकसान होण्यापासून बचावाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची पत वाढेल. कामाचे स्वरूप बदलेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील.  पडणे, मार लागणे, भाजणे यापासून सावधगिरी बाळगावी.

धनू चंद्र-गुरूच्या केंद्रयोगामुळे हाती घेतलेल्या कामातील मेहनत सफल होईल. वरच्या हुद्दय़ावरील लोकांच्या ओळखीतून मदतीचा हात मिळेल. नोकरी-व्यवसायात नवा दृष्टिकोन वापराल. नेहमीचीच कामे नव्या ढंगाने केल्यामुळे त्यातील रटाळपणा कमी होईल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदाराच्या कामकाजात ताणतणाव येतील. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. डोळ्यांच्या समस्या येतील.

मकर शनी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे अडथळे आणि अडचणींची मालिका समोर उभी ठाकेल. धैर्याने सामोरे जाल. यात आपली अतिरिक्त शक्ती खर्ची पडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांपुढे आपले विचार अभ्यासपूर्वक मांडाल. सहकारी वर्ग तोंडदेखले आश्वासन देतील. जोडीदाराच्या साथीने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. एकमेकांचे मनोबळ वाढवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरेल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे हाती घेतलेले काम गतिमान होईल. आपल्यासह इतरांनाही त्याचा लाभ मिळेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेला शब्द वेळेवर कामी येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले विचार आणि मते समजावून द्याल. सहकारी वर्गाकडून मनाप्रमाणे काम करून घेणे त्रासदायक होईल. नातेवाईकांशी जुळवून घेताना तारेवरची कसरत कराल. मान आणि पाठीचा वरचा भाग यांचे दुखणे दुर्लक्षित करू नका. व्यायाम आवश्यक!

मीन मंगळ-गुरूच्या केंद्रयोगामुळे मंगळाची ऊर्जा आणि गुरूचे ज्ञान यांचा सुयोग्य समन्वय होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी जिंकाल. आर्थिक  स्थिती सुधारेल. सहकारी वर्गाकडून कामे करवून घ्याल. जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारींबाबत वैद्यकीय सल्ला घ्या. कौटुंबिक अडीअडचणी सामंजस्याने सोडवाल. रक्तात जीवनसत्त्वांची कमतरता भासेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 7:12 am

Web Title: astrology from 16th to 22 october 2020 dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑक्टोबर २०२०
2 राशिभविष्य : दि. २ ते ८ ऑक्टोबर २०२०
3 राशिभविष्य : दि. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२०
Just Now!
X