सोनल चितळे response.lokprabha@expressindia.com

मेष : चंद्र आणि गुरूचा लाभ योग हा ज्ञानवर्धक योग आहे. गुरूचे ज्ञान आणि चंद्राची ग्रहणशक्ती यांचा सुरेख मिलाप दिसून येईल. मोठय़ांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात मेहनतीला पर्याय नाही. सहकारी वर्गाकडून मदत चांगली मिळेल. नातेवाईकांना या ना त्या मार्गे साहाय्य कराल. जोडीदाराच्या कामातील तणाव कमी होईल. मुलांच्या हिमतीची दाद द्याल. मणका आणि फुप्फुसाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ : चंद्र-शुक्राचा केंद्र योग हा नवनिर्मितीचा कारक योग ठरेल. चंद्राच्या कुतूहलाला शुक्राच्या कलात्मक दृष्टीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेपेक्षा उत्तम प्रकारे कामगिरी पार पाडतील. त्याच्या साहाय्याची जरूर दाद द्यावी. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक कराल. जोडीदाराचा आत्मविश्वास वाढेल. दूषित पाण्यापासून सावधान! पोटाचे विकार उद्भवतील.

मिथुन : रवी-चंद्राचा लाभ योग हा सन्मानकारक योग आहे. मनाचा कारक चंद्र आणि आत्मकारक रवी आपणास यश, कीर्ती देतील. हाती घेतलेल्या कार्यास गती मिळेल. नोकरी-व्यवसायात वेळेचे बंधन पाळून आपले ध्येय साध्य कराल. यासाठी वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांची मदत होईल. जोडीदाराला त्याच्या कामात नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांच्या भावविश्वात रमून जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. उत्सर्जन संस्थेसंबंधित त्रास झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क : चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साहवर्धक योग आहे. मनाचा कारक चंद्र आणि ऊर्जेचा कारक मंगळ आपणास सकारात्मकतेने विचार करून आगेकूच करण्यास उद्युक्त करेल. नोकरी-व्यवसायात अतिस्पष्टवक्तेपणा फारसा उपयोगी ठरणार नाही. शब्द सांभाळून वापरावेत. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गासह खटके उडतील. जोडीदाराच्या मेहनतीला यश येईल. मुलांसंबंधित खर्च वाढतील. मानसिक ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मनमोकळी चर्चा करावी.

सिंह : चंद्र-शनीचा केंद्र योग मेहनतीला यश देणारा योग आहे. चंद्राच्या उत्साहाला शनीच्या चिकाटीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या करारी स्वभावाची झलक दाखवाल. वरिष्ठांच्या विचारांशी सहमत असाल. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक बाबतीत उपयोगी ठरेल. मुलांच्या गुणांना वाव मिळाल्याने त्यांची प्रगती होईल. मानसिक ताणतणावापासून दूर राहण्यासाठी आपल्या छंदामध्ये मन रमवाल. मणका आणि कंबर यांचे दुखणे डोकं वर काढेल. काळजी घ्यावी.

कन्या :चंद्र-मंगळाचा लाभ योग आत्मविश्वासवर्धक असेल. चंद्राची चंचलता आणि मंगळाच्या उत्साहामुळे घाईघाईने  निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात कामातील बारकावे लक्षपूर्वक टिपाल. वरिष्ठांशी काही मुद्दय़ांवर चर्चा करणे जरुरीचे आहे. सहकारी वर्गाच्या उल्लेखनीय कामगिरीची दाद द्याल. गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. जोडीदाराचे काम मार्गी लागेल. मुलांच्या कष्टाचे चीज होईल. डोळे-कानाचे त्रास उद्भवतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

तूळ : चंद्र-मंगळाचा केंद्र योग नवी उमेद देणारा योग असेल. मंगळाच्या उत्साहाला चंद्राच्या भावनाशीलतेची साथ मिळेल. नातेसंबंध जपाल. नवनवीन गोष्टींचे विचार डोक्यात घोळत राहतील. विचारांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे! नोकरी-व्यवसायात जोमाने कामे पूर्ण कराल. सहकारी वर्गाच्या सूचनांचा आस्थापनेला लाभ होईल. जोडीदाराची साथ लाभेल. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सावधगिरी बाळगा. रक्तातील घटक कमी-अधिक होतील. औषधोपचार करावा.

वृश्चिक  : चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग सकारात्मक भावनिकता देणारा योग आहे. मनाच्या चंचलतेला आणि भावनांच्या आवेगाला योग्य पद्धतीने सावरून घ्याल. नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम स्वीकारू नका. प्रकरणाची शहानिशा करून घ्यावी लागेल. सहकारी वर्गाचा पाठिंबा मिळवताना अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. जोडीदाराला त्याच्या कार्यात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मुले समाधान देतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील.

धनू : बुध-नेपच्यूनचा केंद्र योग हा कुतूहल वाढवणारा योग आहे. बुधाची बुद्धी आणि नेपच्यूनची अंत:स्फूर्ती विचारांमध्ये नावीन्य देईल. उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात नव्या योजनांसंबंधी कामकाज सुरू  कराल. सहकारी वर्ग आणि ज्येष्ठ वरिष्ठांची साथ मिळेल. मुलांच्या प्रश्नांचा पुनर्विचार करावा लागेल. घाईने निर्णय घेऊ नका. जोडीदाराचा सल्ला आणि त्याच्यासह केलेली चर्चा कौटुंबिक दृष्टय़ा उपयुक्त ठरेल. त्वचेचे-श्वासाचे त्रास वेळीस तज्ज्ञांच्या निदर्शनास आणून द्यावेत.

मकर : शनी-चंद्राचा लाभ योग हा मेहनतीला पोषक ठरणारा योग आहे. कष्टाचे फळ मिळेल. चंद्राच्या कृतिशीलतेला शनीच्या चिकाटीची साथ मिळाल्याने प्रयत्नांमध्ये सातत्य राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागणे कठीण जाईल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने आणि मध्यस्थीने वेळ निभावून न्याल. जोडीदाराच्या कामातील अडथळे दूर होतील. मुलांच्या निर्णयाला पाठिंबा द्याल. हात-पाय यातील शिरा, नसा आखडतील. औषधे आणि व्यायाम आवश्यक!

कुंभ : रवी-हर्षलचा लाभ योग उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरेल. ऊर्जेचा कारक रवी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कारक हर्षल यांच्या या शुभ योगामुळे काही नव्या लाभकारक घडामोडी होतील. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक दृष्टय़ा प्रगती करण्यासाठी पावले उचलाल. सरकारी वर्गाच्या सहकार्याची अपेक्षा ठेवू नका.  कुटुंब सदस्यांना उमेद द्याल. मुलांच्या बाबतीत हळवे व्हाल. मान, खांदे आणि दंड यांच्या संबंधित तक्रारी निर्माण होतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कुंभ : चंद्र-बुधाचा लाभ योग व्यवहारचातुर्य वाढवणारा योग आहे. चंद्राच्या चंचलतेला बुधाच्या कुतूहलाची चांगली साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात उद्भवलेले प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न कराल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन कामी येईल. सहकारी वर्गाकडून आपल्या अपेक्षेप्रमाणे कामे वेळेत पूर्ण करून घ्याल. दरम्यान मानसिक ताण वाढेल. कुटुंब सदस्यांकडून आनंद वार्ता समजतील. जोडीदाराला त्याच्या कामात यश मिळेल. मुलांशी प्रेमाने वागाल. आरोग्य चांगले राहील.