विज्ञान
शशिकांत धारणे – response.lokprabha@expressindia.com

मित्रहो, शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की अगदी चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकापासून आम्ही वाचतोय की पृथ्वी गोल आहे. मध्येच आता या लेखकाला काय झाले? पण मला सांगा की तुमच्याकडे काय पुरावा आहे पृथ्वी गोल असल्याचा? कसे सिद्ध कराल तुम्ही? खरे तर पृथ्वी गोल आहे असे ओरडून सांगणे हे एक ‘कारस्थान’ आहे. देशोदेशीच्या राजकारण्यांनी आणि ‘नासा’सारख्या स्वत:ला अंतराळ संशोधन संस्था म्हणवणाऱ्या संस्थांनी लोकांना फसविण्यासाठी रचलेले हे एक कपटकारस्थान आहे.

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
What happens to your body if you use expired makeup repeatedly is it harmful to use expired cosmetics products
एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्स वारंवार वापरल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टर सांगतात…
Loksatta kutuhal The technology behind perfect intelligence
कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्तेमागील तंत्रज्ञान

अहो, थांबा, थांबा हे सगळे माझे नाही तर ‘सुधारलेल्या’ अमेरिकेत असलेल्या ‘सपाट पृथ्वी संस्था’ म्हणजे ‘फ्लॅट अर्थ सोसायटी’च्या सदस्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते पृथ्वी ही एक सपाट तबकडी आहे. तिच्या मध्यभागी आर्क्टिक वर्तुळ आहे तर अंटार्क्टिका म्हणजे या तबकडीची बर्फाची कुंपणिभत. लोक भिंतीवरून पडू नयेत म्हणून ‘नासा’ तिची राखण करीत असते, वगरे वगरे.

अनेक सामान्य अमेरिकी नागरिकांबरोबरच अनेक ख्यातनाम अमेरिकी सेलेब्रिटीसुद्धा या संस्थेचे सदस्य आहेत. पृथ्वी सपाट आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांचा एक म्होरक्या मार्च २०१८ मध्ये एका रॉकेटमध्ये बसून १९०० फुटांपर्यंत झेप घेऊन परतला. उतरताना त्याची हवाई छत्री उघडली, तरी तो जोरात आदळला आणि जखमी झाला. तो आता आणखी उंचावर जाऊन पाहण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहे म्हणे. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्या वर्षी तर यांनी एक मोठी कॉन्फरन्ससुद्धा भरवली होती.

मुद्दा असा आहे की पृथ्वी गोलाकार आहे हे आपण कसे सिद्ध करू शकतो? तर निरीक्षण आणि वैज्ञानिक तत्त्वे यांचा वापर करून. प्रथम आपण काही वैज्ञानिक तत्त्वे पाहू या. सर्वात पहिले म्हणजे दिवस आणि रात्र. एकाच वेळी पृथ्वीवर एका ठिकाणी दिवस असतो तर दूरवरच्या दुसऱ्या ठिकाणी रात्र असते. हे पृथ्वी वाटोळी असेल तरच शक्य आहे. ती सपाट तबकडीसारखी असेल तर पृथ्वीवरील सर्व ठिकाणी एकाच वेळी दिवस आणि एकाच वेळी रात्र असती. सगळीकडे एकाच वेळी सूर्य उगवला असता आणि मावळला असता. असे होत नाही, कारण पृथ्वी गोल आहे.

क्लर्क मॅक्सवेल या अंतरिक्षवैज्ञानिकाने गणिताच्या साहाय्याने हे सिद्ध केले की विश्वात सपाट तबकडीसारखी गोष्ट दीर्घकाळ टिकणे अशक्य आहे. या गणितावरूनच त्याने भाकीत केले होते की शनी या ग्रहाभोवती असणारी वलये ही तबकडय़ांच्या रूपात नसतील तर तुकडय़ांच्या/ कणांच्या स्वरूपात असतील. त्याचे हे प्रमेय नंतर सिद्ध झाले. त्याच प्रमेयानुसार एवढय़ा मोठय़ा आकाराची पृथ्वी तबकडीच्या स्वरूपात स्वत:भोवती फिरत असायला हवी असेल तर ती आताच्या तिच्या फिरण्याच्या वेगापेक्षा खूप जास्त वेगाने फिरावी लागेल आणि या वेगामुळे जे केंद्रोत्सारी बल निर्माण होईल ते एवढे जास्त असेल की त्यामुळे पृथ्वीचे तुकडे तुकडे होतील.

गुरुत्वाकर्षण बल हे सर्व दिशांना समान असते आणि ते वस्तुमानाला वस्तुमानाच्या केंद्राकडे खेचून घेते. जेवढे वस्तुमान जास्त तेवढे गुरुत्वाकर्षण बल जास्त. यामुळेच गुरुत्वाकर्षण पृथ्वी किंवा तत्सम कोणत्याही ग्रहाला अथवा उपग्रहाला गोल बनवते. परंतु पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते आणि केंद्रोत्सारी बल हे फिरण्याच्या वेगाच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. गुरुत्वाकर्षण आणि केंद्रोत्सारी बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात. गुरुत्वाकर्षण कोणत्याही वस्तुमानाला खेचून घेते तर केंद्रोत्सारी बल त्या वस्तुमानाला केंद्रापासून दूर ढकलते. या दोन्ही बलाच्या एकत्रित परिणामाने आपल्या पृथ्वीला हा जवळजवळ गोल (दोन्ही ध्रुवांना किंचित चपटा असलेला गोल) आकार प्राप्त झालेला आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे पृथ्वीवरील ऋतू. पृथ्वी सपाट असती तर सर्व ठिकाणी एकच ऋतू असायला हवा होता. पण तसे होत नाही. अमेरिकेत उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये कडक थंडी असते आणि ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळा असतो त्या वेळी अमेरिकेत थंडी असते. हे होते ते पृथ्वी गोल असल्यामुळे आणि तिचा अक्ष कललेला असल्यामुळे.

आता थोडय़ा निरीक्षणांकडे लक्ष देऊ या. पृथ्वी सपाट असती तर आपल्याला एखाद्या उंच इमारतीच्या टोकावरून हजारो मलांवरची वस्तूसुद्धा दिसायला हवी होती. पण तसे होत नाही कारण पृथ्वीचा वक्र पृष्ठभाग. या वक्रतेमुळे आपल्याला आपण ज्या उंचीवर असतो त्यानुसार दिसणाऱ्या क्षितिजापलीकडील गोष्टी दिसत नाहीत. एखाद्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर बसून दूरवरून येणारे जहाज लक्षपूर्वक पाहिलेत का? प्रथम आपल्याला त्या जहाजाच्या सर्वात वरचा बिंदू म्हणजे डोलकाठीचे टोक किंवा आधुनिक जहाजाच्या धुराडय़ाचे टोक प्रथम दिसते, त्यानंतर धुराडे, त्यानंतर हळूहळू खालचा भाग असे दिसत जाते. दूर जाणारे जहाज आपण पाहात असू तर याच्या उलट क्रमाने ते दिसेनासे होत जाते. म्हणजे प्रथम खालचा भाग दिसेनासा होते, मग वरचा आणि सर्वात शेवटी सर्वात वरचे टोक दिसेनासे होते. याचे कारण म्हणजे पृथ्वीचा आणि अर्थातच त्यावर असणाऱ्या समुद्राचा वाटोळेपणा. पृथ्वी सपाट असती तर सगळेच्या सगळे जहाज आपल्याला एकदम येताना किंवा जाताना दिसले असते. तसे होत नाही, कारण पृथ्वी गोल आहे.

आणखी एक निरीक्षण म्हणजे आपण उत्तरेला आकर्ि्टक वर्तुळाजवळ उभे राहून आकाश पाहिले तर जे तारे, जी नक्षत्रे आपल्याला दिसतात ते तारे किंवा ती नक्षत्रे आपल्याला अंटाíक्टकवरून दिसत नाहीत आणि जे तारे किंवा जी नक्षत्रे अंटाíक्टकवरून दिसतात ती उत्तरेतून दिसत नाहीत. पृथ्वी सपाट असती तर कोणत्याही ठिकाणावरून आपल्याला तेच तारे आणि तीच नक्षत्रे दिसली असती. पण तसे होत नाही, कारण पृथ्वी गोल आहे.

याशिवाय आजवर ज्या असंख्य अवकाशयानांमधून आणि अवकाशयात्रांमधून पृथ्वीची लाखो छायाचित्रे काढली गेली आहेत, ती स्पष्टपणे दाखवून देतात की पृथ्वी वाटोळीच आहे. अशी अनेक निरीक्षणे आणि वैज्ञानिक तत्त्वे आपल्याला सिद्ध करून देतात की पृथ्वी गोल आहे. आज २१व्या शतकात आधुनिक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण हे विविध प्रकारे सिद्ध करू शकतो, पण ही काहीही साधने हाताशी नसताना ग्रीक विचारवंत पायथागोरस याने पृथ्वी गोल असल्याचे मत ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात मांडले होते. अर्थात याला त्याच्याकडे फारसा शास्त्रीय आधार नव्हता, पण गोल हा सर्वात परिपूर्ण आकार असल्याने पृथ्वी तशीच असावी अशी त्याची विचारधारा होती. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात अ‍ॅरिस्टॉटल याने काळजीपूर्वक निरीक्षणांवर आधारित पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांत मांडला.

अ‍ॅरॅटोस्थेनस या ग्रीक विचारवंताने मात्र एक प्रयोग करून पृथ्वी सपाट नसल्याचे सिद्ध केले. ख्रिस्तपूर्व  २४० मध्ये स्येन म्हणजे आजच्या इजिप्तमधील आस्वान इथे त्याने २१ जून रोजी सूर्य डोक्यावर असताना एका विहिरीच्या तळाला त्याचे थेट प्रतिबिंब पडते म्हणजेच त्या वेळी तिथे सावली नसते हे ऐकले होते. पण त्याच वेळी तिथून काही अंतरावर असलेल्या अलेक्झांड्रिया या गावात मात्र एका काठीची सावली पाहिली आणि त्या सावलीचा कोन मोजला. तो होता ७.२ अंश. यावरून त्याने मांडले की पृथ्वी सपाट नाही. कारण ती सपाट असती तर दोन्ही ठिकाणी सावल्या गायब झाल्या असत्या. एवढेच मांडून तो थांबला नाही तर त्यावरून त्याने स्येन आणि अलेक्झांड्रिया या गावांमध्ये पाच हजार स्टेडिया (त्या वेळचे अंतर मोजण्याचे एकक) असल्याचे मांडले होते. याच पद्धतीचा वापर करून त्याने नंतर पृथ्वीचा परीघ दोन लाख ५० हजार स्टेडिया असल्याचे मत मांडले. एक स्टेडिया म्हणजे सुमारे ५०० फूट असे मानतात. त्यानुसार हा परीघ आजच्या एककात सुमारे २४ हजार मल (सुमारे ३८ हजार ६२५ किमी) एवढा येतो. आजच्या मोजमापानुसार तो विषुववृत्तावर सुमारे ४० हजार किलोमीटर आहे. म्हणजे अ‍ॅरॅटोस्थेनस अगदी अचूक होता असेच म्हणावे लागेल.

म्हणजे गेली सव्वादोन हजार वष्रे विविध वैज्ञानिक तसंच निरीक्षणांच्या कसोटय़ांवर टिकून राहिलेले आहे ते सत्य हे ‘सपाट पृथ्वी समर्थक’ मानायला तयार नाहीत. अशा या डोळ्यांवर झापडं बांधणाऱ्या माणसांना काय सांगायचे?