वैथे वाद संपतो तिथे संवाद सुरू होतो, हे तत्त्व जपणाऱ्या लेखिकेने या पुस्तकात संवादाविषयी आणि आत्मसंवादाविषयी लिहिले आहे.

भोवताली वावरणाऱ्या व्यक्तींशी झालेल्या संवादातून त्यांचं जगणं, समस्या, धडपड हे सारं उमजतं. त्यातून अधोरेखित होणाऱ्या अनेक छोटय़ा पण महत्त्वाच्या गोष्टींचे चिंतन लेखिकेने या पुस्तकात केले आहे. समाजातील विविध वृत्ती-प्रवृत्ती, समज-गैरसमज याविषयी अंतर्मुख करणारे असे हे लिखाण आहे.

जिथे वाद संपतो तिथे संवाद सुरू होतो, असे  लेखिकेचे स्पष्ट मत आहे. इतरांशी संवाद साधण्याआधी अंतर्मुख होऊन स्वत:शीच कसा संवाद साधायचा यावरही लेखिका सविस्तर लिहिते. आपल्या आयुष्यातील अनेक व्यक्तिरेखा मांडत त्यांच्याशी सुरू असलेला लेखिकेचा संवाद- आत्मसंवादही या पुस्तकात डोकावतो. ‘म्हणून जग चाललंय’मधला तिला भेटलेला पोलीस, शूटिंगवरून येणारी अभिनेत्री, ‘दु:ख ओले सांधताना’मधील क्षुल्लक फायद्यासाठी होणाऱ्या चुका, ‘संधी धडा शिकविण्याची’मधून मतदार आणि लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा आदी गोष्टी विचार करायला लावतात.

‘संवाद स्वत:शी’- अनुराधा राजाध्यक्ष, उद्वेली बुक्स,

पृष्ठे- १६४, मूल्य- १६० रु. ल्ल

 

प्रत्येकाच्या आयुष्यातील ‘मिस्ड् कॉल’!

द्यक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीवर कुटुंबातील सारे याच क्षेत्रात कार्य करीत असूनही पत्नीला दुर्धर आजाराने हिरावून नेल्याची खंत ‘मिस्ड कॉल’ या पुस्तकातून लेखक डॉ. उदय पाठक यांनी मांडली आहे. पाठक यांच्या पत्नीला झालेला ‘हॉजकिन्स लिंफोमा’ नावाचा कर्करोगाचा दुर्धर आजार, तिने भोगलेल्या यातना, उपचार घेताना झालेल्या चुका यावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.

या कठीण प्रसंगातून जाताना पत्नीची त्यांच्या आयुष्यात मिळालेली नि:स्वार्थी साथ, प्रेम यासंबंधीचे भावविश्व ही त्यांनी उलगडले आहे. आयुष्यातील समस्यांवर चर्चा करताना त्याचा शेवट हसरा कसा करावा याविषयीचे त्यांचे विवेचन वाचनीय आहे.

पत्नीच्या निधनानंतर पाठक यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, मनातील घुसमट या पुस्तकाच्या रूपाने मोकळी झाली आहे. आयुष्यात जोडीदाराची साथ किती महत्त्वाची असते हे ‘मिस्ड कॉल’च्या निमित्ताने जाणवते.

‘मिस्ड् कॉल’- डॉ. उदय पाठक.

अनुवाद – शरतकुमार माडगूळकर, विश्वमोहिनी प्रकाशन, पृष्ठे- १५५, मूल्य – १८० रु.  ल्ल