27 November 2020

News Flash

हे अभागी दिवस

आमच्या कुळातला कोण पापी माणूस मुतलाय खळखळ झऱ्यात म्हणून आम्हाला स्वच्छ वाहतं पाणी नजरेलाही पडत नाहीय नदीची खणा-नारळानी

| February 10, 2013 12:12 pm

आमच्या कुळातला
कोण पापी माणूस मुतलाय खळखळ झऱ्यात
म्हणून आम्हाला
स्वच्छ वाहतं पाणी नजरेलाही पडत नाहीय
नदीची खणा-नारळानी
ओटी भरत राहिलो
नदीही येत राहिली
माहेरवाशीण लेकीसारखी,
अंगावर तरंग खेळणारं
तुडुंब पाणी नांदलंच नाही कधी
तळ्याला मोजपट्टय़ा लागल्या
नदीची वाळूसुद्धा उपसून नेली
धनदांडग्यांनी,
उपचाराच्या शोधात
जखमी माणसाला खांद्यावर घेऊन
फिरल्यासारखे
रिकामे हंडे घेऊन
पाण्याच्या शोधात अनवाणी पाय
ज्यांच्यात काही विकत घेण्याची
ताकदच निर्माण होऊ शकली नाही
त्यांनी पाच रुपयाला
हंडाभरून पिण्याचं पाणी विकत घ्यावं
हे एकेक दिवस जिवंत राहण्याची
परवानगी घेतल्यासारखं
विहिरीतल्या चिमूटभर
पाण्याभोवती वळवळणारे पोहरे
दगडी शस्त्र हातात घेऊन
शिकारीमागं पळणारा
नंगा माणूसच आवृत्त होतोय
टॅंकरमागं पळणाऱ्या माणसाच्या निमित्तानं
लागू नयेत मुंग्या म्हणून
कोरडय़ाठण्ण डोळ्याने
धरून ठेवलेली ओल
त्यात तडफडतायत
हे अभागी दिवस

 दासू वैद्य
(आगामी संग्रहातून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 12:12 pm

Web Title: this unlucky days
टॅग Poet
Next Stories
1 काँग्रेस-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू!
2 हसरा अश्रू!
3 आद्य नाटककार : भास
Just Now!
X