Laxmi Pujan Wishes 2023 Wishes in Marathi: दिवाळी हा प्रकाशांचा सण आहे आणि सर्वात जास्त उत्साहात, धुमधडाक्यात साजरा केला जाणारा सण आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्वाचा आणि प्रमुख सण आहे. या सणाची सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि प्रकाशाचा सण होय. दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. यावेळची दिवाळी रविवार, १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. या दिवासाला खास करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर या शुभेच्छा संदेशाचा उपयोग होईल, पाहा खास शुभेच्छा संदेश…

लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीच्या मराठीतून द्या शुभेच्छा!

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला

दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची,
घरी नांदू दे सुख-समृद्धी
या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना
लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे तुम्ही आपल्या नातेवाईक मित्र-मैत्रीणींना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा Whatsapp Status, Instagram Story, Facebook वर शेअर करण्यासाठी पाठवू शकता.