News Flash

नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला, एक जहाल नक्षलवादी ठार

मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. गस्तीवर असलेल्या सी-६० जवानांच्या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल कमांडोंनीही नक्षलवाद्यांवर हल्ला चढवला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या धुमश्चक्रीत एक नक्षलवादी ठार झाला आहे.

सी-६० कमांडोंचा दबाव वाढत असल्याचं पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. जंगल परिसराची पाहणी केली असता कमांडोंना एका नक्षल्याचा मृतदेह, १ हत्यार, २० पिट्टू आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य सापडलं. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवणं बाकी असून आजच्या घटनेनंतर सी-६० कमांडोंनी परिसरातली गस्त अधिक वाढवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 9:01 pm

Web Title: 1 naxal killed in gunfight with c 60 commando in chandrapur forest psd 91
Next Stories
1 महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण, १९८ मृत्यू
2 अकोल्यात करोनामुळे आणखी एक मृत्यू तर १० नवे रुग्ण पॉझिटिव्ह
3 बँकांच्या आठमुठ्या भुमिकेमुळे मदत वाटपात उशीर – खासदार सुनील तटकरेंचा आरोप
Just Now!
X