News Flash

मोठी बातमी! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा करोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.

यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ साली एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. एकूण आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल याबद्दलची माहिती लवकरच जाहीर करू, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?


करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आलं आहे. १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने दिले जातील. तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनारचं आयोजन १० जून रोजी करण्यात आलं होतं. त्यानंतर २३ जून ते ०२ जुलै या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी आपल्या संगणक प्रणालीमध्ये हे गुण नोंदवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 2:59 pm

Web Title: 10th ssc board result will be declared online on tomorrow 1 pm vsk 98
Next Stories
1 …तर संघाचा मनुवाद, ब्रिटिशांशी संगनमत, देशविरोधी कारवायाही अभ्यासाव्या लागतील – काँग्रेस
2 Maharashtra MHT CET 2021 : परीक्षेसाठी नोंदणीची आज शेवटची तारीख
3 “केंद्र व राज्याच्या वादात आम्हाला पडायचं नाही ; राज्य सरकारने पटलावर मांडलेलं कृषी विधेयक मागे घ्यावं”
Just Now!
X