अलिबाग- रायगड जिल्ह्यात दिवसभरात करोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ६१५ नवे रुग्ण आढळून आले. उपचारानंतर  ७९० जण करोनामुक्त झालेत. जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ४० हजार ४०३ वर पोहोचली आहे. यापैकी ३३ हजार २४९ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ६ हजार ०७० करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १०८४ जणांचा आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ६१५ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत २१५, पनवेल ग्रामीण ७५, उरण ५, खालापूर ३०, कर्जत ३४, पेण ७८, अलिबाग ५६, मुरुड ३, माणगाव २४, तळा ७, रोहा २६, सुधागड २, श्रीवर्धन ४, म्हसळा ४, महाड ३४, पोलादपूर येथील १८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या ६ हजार ०७० करोनाचे रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील २ हजार १३७,  पनवेल ग्रामीण ८०१, उरण १८२, खालापूर २६८, कर्जत २४१, पेण ४९४, अलिबाग ६५३, मुरुड ६९, माणगाव ३८१, तळा ४४, रोहा ४४१, सुधागड ५८, श्रीवर्धन ५५, म्हसळा ४३, महाड १६५, पोलादपूर येथील ३८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे, तर मृत्यूदर ३ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२.३ आहे. ४ हजार २९६ जणांवर गृह विलगिकरणात उपचार सुरु आहेत. २१४ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत असून तर २१ जण कृत्रीम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे.