News Flash

Break The Chain : जाणून घ्या जनतेच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे माहिती

संग्रहीत

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे, दिसून येत आहे. सर्वसामान्यांमध्ये निर्बंधांबाबत काहीशी संभ्रमावस्था दिसत आहे. या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहेत.

१. डी मार्ट, रिलायन्स, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का?
– राज्य शासनाने ४ आणि ५ एप्रिल रोजी निर्बंधांबाबत आदेश काढले असून, जी दुकानं, मॉल्स यातील आवश्यक/ जीवनावश्यक वस्तू विक्री करत आहेत, ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत सुरू राहणार आहेत. तर, अनावश्यक वस्तूंचे विभाग बंद राहणार आहेत.

२. वीकेंड लॉकउनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?
– आदेशात म्हटल्यानुसार आवश्यक सेवा सुरू राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय बाहेर फिरू शकणार नाही.

३. वीकेंड लॉकडाउनला कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू राहणार का?
– करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून बाजास समित्या सुरू राहू शकतील. परंतु नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले तर राज्य शासनाची परवानगी घेऊन स्थानिक प्रशासनाकडून बाजार बंद केला जाऊ शकतो. स्थानिक प्रशासनाने याबाबत काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.

४. बांधकामाच्या साहित्याची दुकानं सुरू राहतील का?
– बांधकाम साहित्याची दुकानं सुरू राहणार नाहीत.

५. गॅरेज, ऑटोमोबाईल दुकानं सुरू राहणार का?
– गॅरेज सुरू राहू शकतील मात्र त्यांना करोनाविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. बाकी याच्याशी संबंधित दुकानं मात्र बंद असणार आहेत. करोना नियम न पाळणारे गॅरेज मात्र करोना संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणता येईल का?
– नाही, सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. केवळ आवश्यक सेवेत समावेश असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजता येतील.

७. नागरिकांना मद्य खरेदी करता येईल का?
– होय, ४ एप्रिल रोजी उपहारगृहे व बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे नागरिक निर्धारीत वेळेत बारमधून टेक अवे सुविधेद्वारे किंवा होम डिलिव्हरीने मद्याची खरेदी करू शकतात.

महाराष्ट्र सरकारने केला Break The Chain नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश!

८. मद्यविक्रीची दुकानं सुरू राहतील का?
– नाही

९. रस्त्यालगतचा ढाबा सुरू राहू शकतो का?
– होय, मात्र याला देखीप उपाहारगृहांप्रमाणेच नियम लागू असणार आहे. या ठिकणी बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेता येईल.

१०. इलेक्ट्रिक उपकरणांची (एसी, कुलर, फ्रीज, ) दुरुस्तीची दुकानं सुरू राहू शकतील का?
– नाही

११. टेलिकॉमशी संबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरू राही का?
– नाही

१२. आपले सरकार, सेतू केंद्र सुरू राहू शकतील?
– हो, वीकडेज मध्ये सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू राहू शकतात.

१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ वाजेच्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का?
– ग्राहक आठवड्याच्या नियमित दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या ठराविक वेळेनंतर व वीकेंडला ग्राहक पार्सल घेऊन जाऊ शकणार नाहीत. मात्र ई कॉमर्समार्फत व उपाहारगृहातून होम डिलिव्हरी सेवेमार्फत खाद्यपदार्थ मागवता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 10:18 pm

Web Title: break the chain answers to some questions in the minds of the people msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus – राज्यात दिवसभरात ५८ हजार ९९३ करोनाबाधित वाढले, ३०१ रूग्णांचा मृत्यू
2 वर्धा : खासदार तडस यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
3 हिंगोलीत वाळू माफियांची दादागिरी; जि.प.अध्यक्षास बेदम मारहाण
Just Now!
X