महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा सोमवारी वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. वैधानिक विकास महामंडळाची न घोषणा करण्यावरून भाजपानं ठाकरे सरकार हल्लाबोल केला. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “१२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्यावरून ठाकरे सरकार आणि विरोधी भाजपा यांच्यात पहिल्याच दिवशी सामना रंगला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. राज्यपालांकडे प्रलंबित असलेली विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाली की, दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ दिली जाईल,” असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले होतं. त्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला होता.

आणखी वाचा- विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले…

या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “१२ आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” असं टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर डागलं आहे.

आणखी वाचा- “मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे?”

आणखी वाचा- “मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री….”

“आम्ही काही भिकारी नाही’

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने विधानसभेत वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊन त्यावरील नियुक्ती करण्याचा विषय उपस्थित केला होता. त्यावर अजित पवार यांनी म्हणणं मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली होती. “मनात होते ते ओठांवर आले आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी तुम्ही वैधानिक विकास महामंडळं ओलीस ठेवत आहात. विदर्भ-मराठवाड्यातील जनता माफ करणार नाही. ही मंडळे नसती तर विदर्भ-मराठवाड्याचे पैसे मिळाले नसते. तो आमच्या हक्काचा पैसा आहे. आम्ही काही भिकारी नाही. संघर्ष करू पण दोन्ही विभागाच्या हक्काचा निधी मिळवू. १२ आमदारांची नियुक्ती हा राज्यपाल व तुमच्या सरकारचा विषय आहे. सभागृहाला व राज्यातील जनतेला त्याच्याशी काही देणे घेणे नाही,” असा हल्ला फडणवीस यांनी सरकारवर केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget session nilesh rane criticised ajit pawar bmh
First published on: 02-03-2021 at 10:43 IST