रेल्वेत बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याने पुण्याहून निघालेली हटिया एक्स्प्रेस कोपरगावजवळ अचानक थांबवण्यात आली. एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून रेल्वेची तपासणी करण्यात आली. मात्र, रेल्वेत काहीच आढळून आले नाही. दक्षता म्हणून उशिरापर्यंत रेल्वे कोपरगाव स्थानकातच थांबवण्यात आली होती.

हटिया एक्स्प्रेसच्या एसी डब्यात बॉम्ब असल्याचा फोन रेल्वे प्रशासनाला आला होता. त्यामुळे हटियाकडे जाणारी एक्स्प्रेस अचानक कोपरगाव स्थानकावर थांबवण्यात आली. त्यावेळी सर्व प्रवाशांना सामानसह खाली उतरण्यास सांगण्यात आले. प्रवाशांनी विचारणा केल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब असल्याचे सांगितले. पोलिसांनी श्वान पथक आणले होते. परंतु, तपासणीत काही आढळून आले नाही.

ज्या क्रमांकावरून बॉम्बचा फोन आला होता. तो सध्या बंद आहे. त्यामुळे अजून काहीही समजलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.