राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या बरं होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. आजचा रिकव्हरी रेट हा ९४.५९ टक्के इतका आहे. तर आज नव्याने ३,२८२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज ३,२८२ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर नवीन २,०६४ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १८,३६,९९९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५४,३१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.५९ टक्के झाले आहे.

पुण्यातल्या आकडेवारीतही घट

दरम्यान, पुण्यात दिवसभरात २९० तर पिंपरी-चिंचवडमध्ये १११ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच पुण्यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पुण्यात आज अखेर १ लाख ७९ हजार ५९८ इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा ४ हजार ६४७ वर पोहोचला आहे. आजअखेर पुण्यात १ लाख ७२ हजार ४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.