दर महिन्याला न चुकता अवकाळी पावसाचा फेरा सुरूच असल्याचे चित्र सोमवारी नांदेड, हिंगोली जिल्हय़ांच्या बहुतांश भागात होते. दोन्ही जिल्हय़ांत दुपारी व संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या दरम्यान वीजपुरवठाही खंडित झाला.
नांदेड शहरासह जिल्हय़ाच्या अनेक भागांत तासभर हा पाऊस पडला. देगलूर, माहूर, किनवट, हादगाव आदी ठिकाणी दमदार पाऊस बरसला. बहुतेक ठिकाणी झाडे पडली. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील पळशी येथील एका शेतकऱ्याच्या बलाच्या अंगावर वीज पडल्याने बल जागीच ठार झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने काही लोकांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले. वसमत तालुक्यातील पांगरा िशदे परिसरातही गारांच्या पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह रब्बी पिकाची वाट लागली. अस्मानी-सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दुपारी तीनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाला सुरुवात झाली. िहगोली शहरात तासापेक्षा अधिक वेळ पावसाने हजेरी लावली. सर्वत्र लग्नसराईचे दिवस असल्याने ठिकठिकाणी लग्नमंडप उभे केले जातात. पावसामुळे लग्नसोहळय़ाच्या कार्यक्रमावरही पावसाचा परिणाम होत आहे. सेनगाव तालुक्यातील पळशी येथील माणिक रायवाडे यांनी शेतात बल बांधले होते. दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. शेतात बांधलेल्या बलाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरळी येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. वसमत तालुक्यातील पांगरा िशदे परिसरातही पावसाने हजेरी लावली. सेनगाव, पुसेगाव परिसरातसुद्धा हलक्या पावसाच्या सरी बरसल्या.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2015 रोजी प्रकाशित
हिंगोलीत गारपीट, नांदेडात मुसळधार
दर महिन्याला न चुकता अवकाळी पावसाचा फेरा सुरूच असल्याचे चित्र सोमवारी नांदेड, हिंगोली जिल्हय़ांच्या बहुतांश भागात होते. दोन्ही जिल्हय़ांत दुपारी व संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या दरम्यान वीजपुरवठाही खंडित झाला.
First published on: 05-05-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm in hingoli and rain in nanded