अभिनेता सलमान खान याच्याविरोधातील हिट अॅंड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याचा अभ्यास करून त्यानंतरच राज्य सरकार पुढे काय करायचे याचा निर्णय घेईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानवर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांतून उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
खडसे म्हणाले, उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याची प्रत आम्हाला मिळालेली नाही. त्याची प्रत मिळाल्यावर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर गरज वाटल्यास या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागविण्यात येईल आणि त्यानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिट अॅंड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने सलमान खानला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली आणि त्याच्यावर लावलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
निकालाचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेऊ – राज्य सरकार
हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 10-12-2015 at 15:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run case state govt will take next decision after studying verdict