26 November 2020

News Flash

महाबळेश्वर : संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात एकाची आत्महत्या

हा व्यक्ती करोनाबाधित आहे की नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

प्रतिकात्मक फोटो

महाबळेश्वर येथील एमटीडीसीच्या विलगीकरण कक्षामध्ये शनिवारी सायंकाळी एकाने आत्महत्या केल्याची, धक्कादायक घटना घडली.
पंधरा दिवसांपूर्वी संबंधित व्यक्ती महाबळेश्वर तालुक्याच्या झांजवड गावातन आला होता.

हा व्यक्ती मानसिक आजारी असल्याची माहिती समोर येत असून, त्याला दारुचे व्यसनही होते. याशिवाय तो सतत आत्महत्या करण्याची धमकी देखील देत होता, असेही स्थानिक व विलगीकरण कक्षातील त्याचा सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही व्यक्ती करोनाबाधित आहे की नाही हे अहवाल आल्यानंतर समजणार आहे.

घटनास्थळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील, पोलीस निरीक्षक बी ए कोंडुभैरी, आरोग्य अधिकारी अजय कदम यांनी भेट दिली.  शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घटनास्थळी आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त आहे. सदर व्यक्तीचे नाव प्रशासनाकडून कळवण्यात  आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 2:19 pm

Web Title: mahabaleshwar one commits suicide at the institutional separation center msr 87
Next Stories
1 योद्ध्यांचा यशस्वी लढा : ९६९ पोलिसांनी केली करोनावर मात
2 …म्हणून शिवसेना आज भाजपासोबत नाही; शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
3 सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम : तीन फुटांचे अंतर, मास्क आवश्यक; दिवसातून तीनवेळा सॅनेटायझेशन
Just Now!
X