Graduate And Teacher Constituency Election: मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. नाशिकमध्ये  बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर झालेल्या हाणामारीमुळे या निवडणुकीला हिंसेचे गालबोट लागले. शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांचे समर्थक आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत संदीप बेडसे समर्थक भिडले असून सोशल मीडियावरील पोस्टरवरुन हा वाद झाला.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लालूच दाखविण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शिवसेना, भाजपामुळे या निवडणुकीत रंगत आली असून रविवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे आणि अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, पावसातही ठाणे आणि अन्य भागांमधील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून येत होता.

Graduate And Teacher Constituency Election Updates

07:45 PM : पालघरमध्ये 63 टक्के तर वसईत 52 टक्के मतदानाची नोंद

07:45 PM : कोकण पदवीधर मतदार संघात ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

03: 50 PM: जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या पत्नी कलाराणी कल्याणकर यांनी दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

03:49 PM: ठाणे जिल्ह्यात दुपारपर्यंत सुमारे ३९ टक्के मतदान

01:22PM: नाशिकमध्ये  बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर हाणामारी

12:58PM: मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी बोरिवलीतील शाळेत मतदान केले.

छायाचित्र सौजन्य: दिलीप कागदा

12: 56PM: मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस मतदान करताना

छायाचित्र सौजन्य: दिलीप कागदा

12:32PM: नाशिकमध्ये झालेले मतदान

12:11PM: कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०१८
सकाळी ७ ते ९ पर्यंत झालेले मतदान

पालघर: १,११९ – ७.५%
ठाणे: ३,९६४- ८.६५%
रायगड: १,४७४ – ७.४०%
रत्नागिरी: १,११२- ६.८५%
सिंधुदुर्ग: ४४० – ८.२९%

10: 14AM: नाशिकमध्ये  बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर हाणामारी, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांचे समर्थक आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत संदीप बेडसे समर्थक भिडले, सोशल मीडियावरील पोस्टरचा वाद.

10:06AM: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक: ठाण्यात भरपावसातही दादोजी कोंडदेव स्टेडियममधील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह

10: 05AM: नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेनेने पुरस्कृत केलेले किशोर दराडे, काँग्रेस, राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले संदीप बेडसे यांच्यासह १६ जण भवितव्य आज मतपेटीत बंद होणार.

10: 03AM: कोकण पदवीधर मतदार संघ: डोंबिवलीत सकाळी ९ .३० पर्यंत स.वा जोशी शाळेतील मतदान केंद्रात ४८ तर पश्चिमेला एका मतदान केंद्रात १०७ जणांनी मतदान केले. डोंबिवलीत सुमारे २,५०० मतदार आहेत

10:00AM: कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला या तिघांमध्ये चुरशीची लढत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात एक लाखांपेक्षा कमीच मतदार आहेत.

09:59AM: मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार लोकभारतीचे कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत केलेले अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, बाळासाहेब म्हात्रे, प्रशांत रेडीज यांच्यासह १० जण रिंगणात आहेत. कपिल पाटील यांनी यापूर्वी दोनदा विजय संपादन केला आहे.

09:58AM: मुंबई पदवीधर मतदारसंघात ७४ हजार मतदार आहेत.

09:56AM:मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेसमोर भाजपा, शेकाप व अन्य उमेदवारांचे आव्हान. शिवसेनेकडून विलास पोतनीस रिंगणात. तर भाजपाचे अमित मेहता, काँग्रेस व राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे अ‍ॅड.राजेंद्र कोरडे, डॉ. दीपक पवार, जालिंदर सरोदे आदी १२ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षण विभागाकडून विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यांसाठी लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.