25 October 2020

News Flash

सरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास त्वरीत आंदोलन मागे घेऊ: राजू शेट्टी

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी कधीच बोलावले नाही. चर्चेला आम्हाला बोलावले असेल तर त्यांनी पुरावे जाहीर करावेत

आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना पराभूत केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडखोर हातकणंगले तालुकाध्यक्ष शिवाजी माने यांनी रविवारी दिला.

अनेक दिवसांपासून शेतकरी दूध दरवाढीची मागणी करत आहेत. गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा संप झाला होता. त्यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी २७ रूपयांचा भाव जाहीर केला. पण तो दर शेतकऱ्यांना कधीच मिळाला नाही. राज्यात २० लाख लिटर दूध अतिरिक्त आहे. अतिरिक्त दुधावर सरकारने काहीच तोडगा काढला नाही. दुधाबाबत सरकारचे धोरण फसलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. सरकारने जर आज विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रूपये अनुदान जमा करण्याची घोषणा केली तर आम्ही आजच आंदोलन मागे घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी पुरावे जाहीर करावेत..

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी कधीच बोलावले नाही. त्यांनी निमंत्रण कधी दिले होते, असा सवाल करत मी कधी नकार दिला हे त्यांनी जाहीर करावे. चर्चेला आम्हाला बोलावले असेल तर त्यांनी पुरावे जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी नेहमी तयार असल्याचे ते म्हणाले.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात दूध माफिया तयार झाले असून त्यांनी ५३ कोटींवर डल्ला मारल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. दुधाचा धंदा हा तोट्याचा आहे. शेतकऱ्यांनी किती दिवस हे सहन करायचे. सरकारच्या आडमुठेपणामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन आम्ही रात्री १२ वाजता सुरू करणार होतो. पण पोलिसांनी सरकारच्या आदेशावरून कार्यकर्त्यांना रविवारी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घरी महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कार्यकर्त्यांनी दूध कमी प्रमाणात सांडले आहे. शेतकऱ्यांना दोष देऊ नका. त्यांनी विद्यार्थी, गोरगरीब आणि वारकऱ्यांना मोफत दूध वाटण्यात आले आहे. ९० टक्के दूध चांगल्या कामासाठी वापरले आहे.

जाहीर केलेला भाव शेतकऱ्यांना मिळालेला नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव मिळतो. उत्पादन खर्चाच्या खूप कमी भाव आहे. केरळ, गोवा आणि कर्नाटक सरकार थेट उत्पादकाच्या खात्यावर अनुदान जमा करते. तसे आपल्या सरकारने करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 11:33 am

Web Title: milk protest dudh andolan swabhimani shetkari sanghtana mp raju shetty
Next Stories
1 दूध आंदोलन LIVE: कार्यकर्ते आक्रमक, वाशिममध्ये दुधाचा टँकर पेटवला
2 छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली, तलवारीची वाढली
3 ‘प्रत्येक बेपत्ता मुलगी प्रियकरासोबत पळून गेलेली नसते’, उच्च न्यायालयाने फटकारलं
Just Now!
X