नांदेडमधील रोहयो येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक विचित्र विनंती केली आहे. आपण ऑफिसला येताना घोड्यावर येण्याचा विचार करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मला घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी सहाय्यक लेखाधिकारी असणाऱ्या सतीश देशमुख या व्यक्तीनं केली आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर या पत्राची तुफान चर्चा आहे.

तीन मार्च रोजी हे पत्र लिहिण्यात आलं आहे. ‘कार्यलयीन परीसरामध्ये घोडा बांधण्याची परवानगी मिळण्याबद्दल’, असा या पत्राचा विषय आहे. ‘उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की मी सतीश पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होतो. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी देण्यात यावी, ही विनंती,’ असा मजकूर या पत्रामध्ये आहे. तसेच या पत्राची एक प्रत रोहयोच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्याचेही पत्रामध्ये नमूद केलं आहे.

Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

या अर्जावर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहेत. तसेच या प्रकरणी प्रशासनाची बदनामी झाली असून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या संदर्भानेही जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.