सरकारच्या फसव्या घोषणांच्या विरोधात महाराष्ट्रभर परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जात असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील हे पक्ष संघटना बांधणीवरही भर देत असताना कार्यकर्त्यांचे वर्ग घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुरू असलेल्या निर्धार परिवर्तनाची यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे.निर्धार यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या सभेच्या निमित्ताने जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला जात आहे.

काय असते स्वरूप?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील सभेत प्रोटोकॉल मोडून सुरुवातीला सभेत आपले मनोगत व्यक्त करतात. लगेच पुढील सभेस जाण्याकरता निघतात. त्यावेळी वाटेतच पुढील तालुका बुथ कमिटीचा वर्ग घेतात. यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला सर्व सेलच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आढावाही घेत आहेत. इतकेच नाही तर एखादा कार्यकर्ता पुष्पगुच्छ घेवून भेटायला आला तर त्याला बूथ कमिटी पूर्ण आहे का? बूथ कमिटीवर काम करत आहात का? असा पहिला प्रश्न करतात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी परिवर्तनासाठी कंबर कसली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये परिवर्तन निश्चित होणार ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात खात्री निर्माण करण्याचे कामही करत आहेत.