News Flash

“राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण…”- जयंत पाटील

"...तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल"; राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास

“अनेक जण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता राजुरामध्ये पक्षासाठी काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. पण तरीही आपण पक्ष वाढविण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असतात. अशा लोकांना पक्षात येण्यास प्रोत्साहित करा, पक्षाची बूथ कमिटी मजबूत करा आणि संपर्क वाढवा”, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

“देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल”; राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य

चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर संघर्ष करा. संघर्षाशिवाय गत्यंतर नाही. या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला, तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल”, असा विश्वासही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

“चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याला एकही जागा लढवता आली नाही. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की काही लोक पक्ष सोडून गेले असले तरी आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता पक्षासाठी काम करत आहे”, अशा शब्दात राजुरामधील सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले.

“लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पद दिलेलं असतं. त्याप्रमाणे आपण कामगिरी करायला हवी. पक्षाच्या विश्वासावर खरं ठरणं ही आपली जबाबदारी आहे. नुसती गर्दी करून उपयोग नाही, विचारांचा प्रचार करणारे लोक आपल्याला हवे आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक कुणाचे होत नाहीत. जिथे सत्ता असेल तिथे ते लोक जात असतात. मात्र आपल्याला असे लोक नको आहेत”, असेही जयंत पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 2:46 pm

Web Title: ncp leader jayant patil says even if we are part of mahavikas aaghadi we should concentrate on extending our party manpower vjb 91
Next Stories
1 राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला
2 चुलत्यांमुळे लागली सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय – अजित पवार
3 “अर्णब, कंगनासारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, पण…”
Just Now!
X