जिल्ह्यात एकूण ३६ खासगी दगडखाणींची तपासणी इटीएस मशीनद्वारे केली जाणार  आहे. त्यानंतर महसूल वाढेल, असा अधिकाऱ्यांना अंदाज आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या २०१२ मध्ये झालेल्या बठकीत नावीन्यपूर्ण योजनेतून सुमारे ६ लाख रुपये निधी खर्चातून ५ इटीएस (इलेक्ट्रॉनिक टोटल स्ट्रेशन) मशीनची खरेदी करण्यात आली होती. त्या मशीन िहगोलीतील भूमी अभिलेख कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यातील दोन मशीन विभागीय आयुक्तामार्फत इतरत्र गेल्या होत्या, त्या आता परतीच्या मार्गावर आहेत.
सोलापूर येथील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक वर्षांपूर्वी इटीएस मशीनच्या माध्यमातून खाणींची तपासणी करून घेतली होती. त्यानंतर परत झालेल्या तपासणीत महसूलमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी राज्य शासनाला याबाबत सविस्तर माहिती कळविली. त्यानुसार ही योजना सर्व जिल्ह्य़ात राबविण्याचे ठरविण्यात आले.
 दरम्यान, या वर्षी रेतीघाटाचे लिलाव रद्द होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ७३ पकी ४१ रेतीघाटांचा लिलाव झाला होता. त्यातून २ कोटी २८ लाखांचा महसूल जमा झाला होता. प्रशासनाला १ कोटी १५ लाखांची अपेक्षा असताना मात्र तो जास्तीचा जमा झाला. यावर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ९५ रेतीघाटांचा लिलाव अपेक्षित आहे. मात्र, भूजल सर्वेक्षण विभागाने तसा सर्वेक्षण अहवाल अद्याप दिलेला नाही.