03 June 2020

News Flash

नांदेडमध्ये निवृत्त न्यायाधिशाचे घर फोडून ३ लाखांची चोरी

कुटुंबियांसोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेले असताना ही चोरी झाली.

प्रातिनिधीक छायाचित्र

नांदेडमधील एका प्रसिद्ध निवृत्त न्यायाधिशांचे घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे. ते शहरालगतच्या स्वप्नजा गार्डन वाडी (बु.) येथे वास्तव्यास होते. यामध्ये चोरट्यांनी जवळपास तीन लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश लक्ष्मण नागोराव देवकरे (६४) हे वाडी (बु.) परिसरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी १८ डिसेंबर रोजी कुटुंबियांसोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेले असताना ही चोरी झाली.

घराला कुलूप लाऊन बाजारात गेल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी संध्याकाळी ५ वाजता घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील २ लाख ६८ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व २० हजार रूपये रोख असा २ लाख ८८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीश लक्ष्मण देवकरे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2018 8:41 pm

Web Title: robbery in house of retired judge in nanded laxman devkare
Next Stories
1 सिडकोच्या मालमत्तांना लीजच्या मुदतीत वाढ, NOC ची गरज नाही
2 एमआयएमचा हात सोडणार नाही, प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण
3 भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचे कारण शोधाच-कुहू
Just Now!
X