गेल्या १५ वर्षांपासून विरोधी बाकावर असल्याने शासकीय सुविधांपासून कोसो दूर असलेल्या शिवसनिकांनी रविवारी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आदरातिथ्याचा सुखद अनुभव घेतला. यावेळी अनेक ज्येष्ठ शिवसनिकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला एक जागा मिळाली होती. पण कालांतराने िहदुत्वाच्या मुद्दय़ावर त्यांचीही आमदारकी रद्द झाली. १९९५ च्या निवडणुकीत मात्र नांदेड जिल्ह्यातून युतीचे चार आमदार विजयी झाले होते. प्रकाश खेडकर, रोहिदास चव्हाण, सुभाष वानखेडे (शिवसेना) व डी.बी.पाटील (भाजपा) यांनी आपआपल्या प्रतिस्पध्र्यावर मात केली होती. सुदैवाने राज्यातही युतीचे सरकार आले. बऱ्याच कालखंडानंतर व अनेक वर्षांच्या सत्ता-संघर्षांनंतर विधानसभेवर भगवा फडकल्याने शिवसनिकांची ‘चलती’ होती. महसूल विभाग असो की पोलीस प्रशासन, वनविभाग असो की सार्वजनिक बांधकाम सर्वच कार्यालयात शिवसनिकांचा बोलबाला होता. १९९५ ते ९९ या कालावधीत युतीच्या कार्यकर्त्यांना सत्तेची जणू सवयच जडली होती.
१९९९ च्या निवडणुकीत युतीचे विद्यमान चार आमदार तर निवडून आलेच शिवाय सुभाष साबणे यांच्या रूपाने त्यात आणखी एकाची भर पडली. पाच वर्षं सत्ता व दहा वर्षं बहुतांश मतदारसंघात लोकप्रतिनिधी असल्याने पदाधिकारी आíथकदृष्टय़ा बऱ्यापकी स्थिरावले. पण  सामान्य शिवसनिक पुन्हा रस्त्यावर आला. निवडून येणारे लोकप्रतिनिधी व त्यांचेच समर्थक सत्तेचा उपभोग घेत होते. २००४ नंतर शिवसनिकांमधील मरगळ, गटबाजी इतकी वाढली की २००९ च्या निवडणुकीत युतीचा अक्षरश: सफाया झाला. गेल्या अनेक वर्षांपासून खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यावर आपले निर्वविाद वर्चस्व ठेवले. एवढे की, पक्षाची बठक घेण्यासाठी शिवसनिकांना विश्रामगृह उपलब्ध होऊ नये. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अनेक शिवसनिकांवर खोटय़ा गुन्ह्यांचीही नोंद झाली.
पंधरा वर्षांच्या कालखंडानंतर आता शिवसनिकांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. एरवी विश्रामगृहात शिवसनिकांशी फटकून वागणारे कर्मचारी त्यांचे आदरातिथ्य करत होते. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी शिवसनिकांची बठक घेतली. विश्रामगृहातल्या वातानुकूलित सभागृहात पार पडलेल्या या बठकीदरम्यान मिळालेल्या आदरातिथ्याची सर्व शिवसनिकांमध्ये चांगली चर्चा रंगली होती. जुन्या निष्ठावंत शिवसनिकांनी गेल्या २० वर्षांत घडलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचे खासगी चच्रेत मोठे गमतीशीर कथन केले.