News Flash

यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सहा जणांचा मृत्यू

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व  कामगार असून वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.

यवतमाळ :  दारू मिळत नसल्याने सॅनिटायझर पिणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. यातील दोघांचा शुक्रवारी रात्री तर चौघांचा आज शनिवारी पहाटे मृत्यू झाला. ही घटना वणी येथे घडली

मृतांमध्ये सुनील महादेव ढेंगळे (३२) रा.देशमुख वाडी, गणेश उत्तम शेलार (४०) रा. गायकवाड फैल, दत्ता कवडू लांजेवार (४७) रा.तेली फैल, भारत प्रकाश रुईकर (३८) रा.जटाशंकर चौक, राहुल ऊर्फ नूतन देवराव पाथ्रटकर (४५) रा. तेली फैल, संतोष सुखदेव मेहर (३५) रा.जैताइ नगर, वणी यांचा समावेश आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व  कामगार असून वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत. त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही. दारूचे व्यसन भागविण्यासाठी त्यांनी आपापल्या घरीच सॅनिटायझर पिऊन नशा करण्याचा प्रयत्न केला व सॅनिटायझरचे दुष्परिणाम होऊन त्यांना जीव गमवावा लागला. मृतांपैकी सुनील ढेंगळे व गणेश शेलार यांचा शुक्रवारी रात्रीच मृत्यू झाला. उर्वरित चौघे आज दगावले.  सॅनिटायझर पिल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे.  ते सर्वजण बऱ्याच दिवसांपासून सॅनिटायझर प्राशन करीत असल्याची शंका वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर पोहे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:01 am

Web Title: six die after drinking sanitizer in yavatmal akp 94
Next Stories
1 पुण्यातील आमदराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा डाव उधळला
2 वर्धा : करोनाबाधितांना घरबसल्या डॉक्टरांकडून मिळणार आरोग्यविषयक सल्ला
3 Coronavirus – राज्यात दिवसभरात ६७ हजार १६० नवीन करोनाबाधित, ६७६ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X