नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूरसह मराठवाडय़ात सर्वत्र शनिवारी पारा ४१-४२च्या पुढे गेला. नांदेडला यंदाचे ४४.५ अंश सेल्सिअस, परभणी ४३.५ तसेच उस्मानाबादलाही यंदाच्या सर्वाधिक ४२.०३ तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद ४०.९, बीड ४१, हिंगोली ४२ या प्रमाणे शनिवारचे तापमान नोंदविले गेले. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत असताना भाजून काढणाऱ्या उन्हामुळे संपूर्ण मराठवाडय़ात लोक चांगलेच हैराण झाले आहेत.
सकाळी नऊपासूनच उन्हाच्या असह्य़ झळा जाणवत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट असतो. बाजारपेठाही संध्याकाळी सातनंतर गजबजत आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील गर्दीही तुरळक दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नारळ पाणी, ज्यूस, िलबू शरबत तसेच शीतपेयांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाचा फटका टाळण्यासाठी नागरिकही घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. शक्यतो दुपारच्या प्रहरी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव मोरे यांनी केले. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये किंवा बाहेर पडल्यास िलबू पाणी, नारळ पाणी व इलेक्ट्राल पावडरचा वापर करावा, असेही त्यांनी म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
मराठवाडय़ात पारा बेचाळिशीपार
नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूरसह मराठवाडय़ात सर्वत्र शनिवारी पारा ४१-४२च्या पुढे गेला. नांदेडला यंदाचे ४४.५ अंश सेल्सिअस, परभणी ४३.५ तसेच उस्मानाबादलाही यंदाच्या सर्वाधिक ४२.०३ तापमानाची नोंद झाली.
First published on: 24-05-2014 at 02:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature overtake 4