रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्याही पुढे गेली आहे.  २४ तासात करोनाचे २७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात सध्या २ हजार ४३० करोनाचे रुग्ण आहेत.

आज दिवसभरात १९१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत एकूण ३ हजार ४९८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. गेल्या २४ तासात तब्बल २७३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६ हजार ०५७ वर पोहोचली आहे. २९८ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात २७३ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ९३, पनवेल ग्रामिण मधील ३१, उरण मधील २२, खालापूर २४, कर्जत २५, पेण ३८, अलिबाग ०७, मुरुड १, माणगाव १०, तळा १, रोहा ९, श्रीवर्धन २, म्हसळा ०, महाड ९ पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा ३, खालापूर २, पेण २,उरण येथे एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २३ हजार २६३ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ४३० करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ११६३, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३५७, उरण मधील १३४,  खालापूर १५८, कर्जत ६९, पेण १४१, अलिबाग १३४,  मुरुड २४, माणगाव ५२, तळा येथील २, रोहा ९३, सुधागड १, श्रीवर्धन ३६, म्हसळा २२, महाड ४२, पोलादपूर मधील २ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत १७९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५७ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.   जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, पाठोपाठ, अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.