सांगली : कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मंगळवारी होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील आगाराच्या १०० बस नागरिकांच्या दारी धावणार आहेत. कोल्हापूर मध्ये मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ‘शासन आपले दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी गर्दी व्हावी याकरिता प्रयत्न युध्दपातळीवर करण्यात येत आहेत. 

कार्यक्रमास येण्यासाठी नागरिकांना पदरमोड करावी लागू नये याची काळजी घेतली जात असून प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था घरापर्यंत करण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी  सांगली जिल्ह्यातील विविध आगारातून १०० बसेस रवाना सोमवारी रवाना झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रम ठिकाणी आणण्यासाठी या बस अगदी गावपातळीपर्यंत धावणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, इस्लामपु , तासगांव, विटा, जत ,  आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा पलूस या आगारातून १०० बसची व्यवस्था करण्यात आली असून आज सायंकाळपर्यंत या बस कोल्हापूरमध्ये पोहचतील.