बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नगरसेवकपासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे बिचुकलेंनी शिंदे गटात प्रवेश केला का? अशा चर्चांणा उधाण आलं आहे. त्यावर आता अभिजीत बिचुकलेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, “माझ्या काही राजकीय आणि सामाजिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. साताऱ्यात नवीन नगरपालिका होणार आहे, त्याबाबतही चर्चा केली. गेली वीस वर्षे छत्रपती उदयनराजे भोसलेंना विरोध करुन मोठा झालो असून, माझा तो बाणा आहे. लोकांची कामे करत नसल्याने त्यांना माझा विरोध आहे,” असेही बिचुकले यांनी म्हटलं.

हेही वाचा – मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, सूत्रांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी महाराष्ट्रातला आहे, मला पंतप्रधान…”

“एका पक्षाला किंवा अभिजित बिचुकलेला राज्य, देश चालवणे शक्य नाही. देशाचे पंतप्रधान होण्याचे माझं स्वप्न आहे. कारण, महाराष्ट्रातील अद्याप कोणीही पंतप्रधान झालं नाही. लोकमान्य टिळक म्हणायचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणार’. तसेच, ‘मी महाराष्ट्रातला आहे, मला पंतप्रधान व्हायचं आहे.’ जे माझ्या भूमिकेशी सहमत आहेत, ते मला पाठिंबा देऊ शकतात. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही,” असेही अभिजीत बिचुकलेंनी स्पष्ट केलं.