Amol Mitkari vs Gajanan Kale : “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असो अथवा भोंग्यांविरोधातील आंदोलन असेल, आजपर्यंत कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाहीत”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी (२९ जुलै) केली होती. त्यांच्या या टीकेचे पडसाद उमटू लागले आहेत. आज दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोला येथे मिटकरींच्या कारवर हल्ला केला. त्यानंतर मिटकरी म्हणाले, “अशा हल्ल्यांना मी भिक घालत नाही.”

दरम्यान, यावर आता मनसेनेही प्रतिक्रिया दिली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी मिटकरी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काळे यांनी म्हटलं आहे की “अजित पवारांनी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नुसती पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. तरी घासलेट चोर तोंड वर करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजित पवारांच्या घरातील सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावं लागलंय, हे अजित पवारांचं यश आहे आणि हा घासलेट चोर राज ठाकरे यांच्या यश-अपयशाच्या बाता मारतोय.”

गजानन काळे म्हणाले, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढून २ आमदार निवडून आणून दाखवावेत. मग जाहीर मिशी कापून घासलेट चोराच्या हातात ठेवू. उगाच शरद पवारांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरूनही एक खासदार निवडून आणताना तुमच्या अजित पवारांची दमछाक झाली आहे. ते सुनील तटकरे देखील स्वतःच्या हिंमतीवर निवडून आलेत. त्यात अजित पवारांचं काहीच योगदान नाही. नुसता टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला… आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं.

हे ही वाचा >> Arjun Khotkar : “त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सासू-सुनांनी वेगळं व्हावं”, अर्जुन खोतकरांचा अजब सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी अशा हल्ल्याने घाबरणार नाही : मिटकरी

अकोल्यात कारवर झालेल्या हल्ल्यानंतर मिटकरी म्हणाले, “महाराष्ट्राचं नाव घेतात, वर अशा प्रकारे गुंडागिरी करतात. हा भेकड हल्ला आहे. या हल्ल्याने मी घाबरत नाही. हल्ला झाला तेव्हा मी विश्रामगृहात होतो. काही जण मला भेटायला आले होते. त्यासाठी मी येथे आलो होतो. मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. मी त्याच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे.