एखादा श्वान गाडीखाली आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली होती. दरम्यान, पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या विधानावरून पुन्हा एकदा देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य केलं आहे. देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा प्रश्न अनिल देशमुख्य यांनी विचारला आहे.

हेही वाचा – “पोर्श कार अपघातानंतर ‘त्या’ गोष्टी पुन्हा आठवल्या”; आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!

Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
MP Praniti Shinde says Opposition leader is our Chief Minister
चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका
minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
Eknath Shinde, Uddhav Thackeray,
संपूर्ण राज्यच माझे कुटुंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
sudhir mungantiwar reacts on supriya sules statement about democracy
सुप्रिया सुळेंना मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले “माविआ सरकार होतं तेव्हा..”

काय म्हणाले अनिल देशमुख?

पोर्श कार अपघातासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीस, काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात की गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला, तो पण रविवारी”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. तसेच देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

anil deshmukh
अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल ( फोटो – अनिल देशमुख एक्स सोशल मीडिया खाते )

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय विधान केलं होतं?

फेब्रुवारी महिन्यात ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडून स्वतःही आत्महत्या केली होती. तसेच त्याच्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील एका पोलीस ठाण्यात भाजपा आमदारानेही एकावर गोळीबार केला होता. त्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निष्क्रियता जबाबदार आहे, असा आरोप विरोधकांनकडून करण्यात आला होता. तसेच विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

हेही वाचा – पोर्श अपघात प्रकरणी मोठी अपडेट! अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह बार मालक आणि मॅनेजरलाही अटक

विरोधकांच्या या मागणीला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ते विधान केलं होते. “विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी राजकीय आहे. विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील”, असे ते म्हणाले होते.