संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. येथील राम मंदिराबाहेर हा प्रकार घडला. तसेच जमावाने दगडफेक आणि जाळपोळही केली. दरम्यान, हा राडा पूर्वनियोजित होता असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच याचे खरे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. खैरेंच्या या आरोपाचा केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी समाचार घेतला. कराड म्हणाले की, खैरे यांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कराड म्हणाले की, राम नवमीच्या दिवशी किराडीपुरा येथील प्राचीन मंदिराजवळ जर कोणी असं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. खैरेंचा आरोप खोटा आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. तसेच ते जर यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप करत असतील तर त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.

वित्त राज्यमंत्री कराड म्हणाले की, महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपानं हा कट रचला असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. यावर भागवत कराड म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सभेची आम्हाला कल्पना आहे. त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे. राम नवमीच्या कार्यक्रमाशी त्याला जोडणं चुकीचं आहे. खैरेंचं यासंदर्भातलं वक्तव्य चुकीचं आहे. आम्ही अशा प्रवृत्तीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून दिलं, याचं आम्हाला वाईट वाटतं.

हे ही वाचा >> “माझ्यावरही दगडफेक झाली”, इम्तियाज जलील यांनी सांगितली आपबिती, म्हणाले, “पोलिसांना…”

“खैरेंना निवडून दिल्याचं वाईट वाटतं”

कराड म्हणाले की, आम्ही रात्र-दिवस काम करून खैरे यांना खासदार म्हणून निवडून दिलं होतं. याचं आता आम्हाला वाईट वाटतं. खैरेंची मानसिकता बदलली आहे. सदसद्विवेकबुद्धी ठीक असेल तर ते असं बोलणार नाहीत. राम नवमीच्या दिवशी कोणी असं करेल हे बोलणं चुकीचं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagwat karad says admit chandrakant khaire in mental asylum on his allegations on devendra fadnavis asc
First published on: 30-03-2023 at 15:16 IST