scorecardresearch

भुजबळांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्याची धमकी? भास्कर जाधवांचं मोठं विधान; म्हणाले, “तुम्ही जामिनावर तुरुंगाबाहेर…”

छगन भुजबळांच्या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

bhaskar jadhav and chhagan bhujbal
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अजित पवार गटाचे आमदार आणि विद्यमान अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून सरकारला इशारा दिला. ‘ओबीसी’मधील ६० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. त्यामुळे जर ‘ओबीसीं’च्या ताटातून काढून ते त्यांना (मराठा समुदाय) देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भुजबळांनी केला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे.

अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी आव्हानात्मक भाषा वापरायची गरज नव्हती. अशा पद्धतीने वक्तव्य करण्यासाठी भुजबळांना कुणीतरी धमकी दिल्याचं दिसत आहे. पण दोन्ही समाजातील लोकांनी संयम ठेवावा, अशी माझी विनंती आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

supriya sule denies contact of praful patel with sharad pawar
शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
rohit pawar on devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू”, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…
pankaja munde raj thackeray
“सोसायटीचं नाव सांगा, त्यांना धडा शिकवू”, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर मनसे नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया
What Nitin Gadkari Said?
“फुकट मदत केली लोकांना वाटतं, हा मंत्री आहे याच्याकडे हरामाचा पैसा…”; नितीन गडकरींचं वक्तव्य

हेही वाचा- “लाठीमार होताच मनोज जरांगे घरात जाऊन झोपले”; भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…

भुजबळांच्या वक्तव्यावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, “छगन भुजबळ यांनी ज्या आवेशात आणि जोशात आव्हानात्मक भाषा केली. ती आव्हानात्मक भाषा करण्याची काहीही गरज काय नव्हती. पण तुम्ही अशाप्रकारे वक्तव्य करा, अशी कुणीतरी भुजबळांना धमकी दिलेली दिसत आहे. तुम्ही जामिनावर तुरुंगाबाहेर आहात, अशी जाणीव भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याने करून दिल्यामुळेच भुजबळ अशा प्रकारचे वक्तव्य करतायत. परंतु दोन्ही समाजाच्या लोकांनी संयम ठेवावा, अशी माझी एकच विनंती आहे.”

हेही वाचा- मोठी बातमी: आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न परत करू नको, असा इशारा देत भुजबळ यांनी जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला. ‘मराठा कुणबी’ आणि ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्रांची संख्या आणि त्या अनुषंगाने प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केले. स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६८ मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेले आहे. त्यानंतर बी. पी. मंडल व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभर फिरून तयार केलेला अहवाल तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी स्वीकारून ५४ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ओबीसींशिवाय इतरांना आरक्षण देण्याची मुभाच नव्हती. परंतु सध्या जे मराठा दैवत निर्माण झाले आहे ते धनगर, माळी, तेली यांना आरक्षणात मध्येच घुसवल्याचे सांगतात, असे मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख टाळून भुजबळ म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhaskar jadhav on chhagan bhujbal challenge to manoj jarange and maratha community obc reservation rmm

First published on: 20-11-2023 at 17:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×