मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समुदायाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार आणि विद्यमान अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून सरकारला इशारा दिला. ‘ओबीसी’मधील ६० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. त्यामुळे जर ‘ओबीसीं’च्या ताटातून काढून ते त्यांना (मराठा समुदाय) देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भुजबळांनी केला.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावरही टीकास्र सोडलं. “लाठीमार झाल्यानंतर हे शूर सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन झोपले होते. त्यांना आमचे अंबडचे मित्र राजेश टोपे आणि दुसरे आमचे मित्र रोहित पवार यांनी रात्री तीन वाजता घरातून उठवून आणलं आणि आंदोलन करण्यासाठी बसवलं. शरद पवार आंदोलनस्थळी येणार आहेत, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनाही तिथे आणलं,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. भुजबळांच्या या आरोपांवर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा- मोठी बातमी: आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

“छगन भुजबळ हे स्वत: मंत्री आहेत. मंत्री असताना त्यांना मंत्रीपदाचा योग्य वापर करता येत नसेल, या सरकारमध्ये मंत्र्यांचंच चालत नसेल, मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल, तर यावर आपण वेगळं काय बोलणार? राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर योग्य वेळ आल्यानंतर मी स्वत: यावर स्पष्टीकरण देईन,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न परत करू नको, असा इशारा देत भुजबळ यांनी जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला. ‘मराठा कुणबी’ आणि ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्रांची संख्या आणि त्या अनुषंगाने प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केले. स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६८ मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेले आहे. त्यानंतर बी. पी. मंडल व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभर फिरून तयार केलेला अहवाल तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी स्वीकारून ५४ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ओबीसींशिवाय इतरांना आरक्षण देण्याची मुभाच नव्हती. परंतु सध्या जे मराठा दैवत निर्माण झाले आहे ते धनगर, माळी, तेली यांना आरक्षणात मध्येच घुसवल्याचे सांगतात, असे मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख टाळून भुजबळ म्हणाले.

Story img Loader