नांदेड : मागील पाच वर्षांत नांदेड ते बीदर ह्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा मोठा गाजावाजा करणारे माजी राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाचे खासदार यंदा आपापल्या मतदारसंघात पराभूत झाले. बीदर व नांदेड या दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

बीदर आणि नांदेड या एकमेकांस लागून असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार खुबा आणि चिखलीकर यांनी निवडणूक प्रचारात नव्या रेल्वेमार्गाचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. काँग्रेसचे डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या राजवटीत नांदेड ते बीदर या नव्या रेल्वेमार्गाची मागणी सर्वप्रथम झाली होती. २०१४ साली भगवंत खुबा हे बीदरमधून लोकसभेवर गेल्यानंतर त्यांनी याच मागणीकडे मोदी सरकारचे लक्ष वेधले; पण या नव्या रेल्वेमार्गासंबंधी काही घडामोडींची नोंद मागील पाच वर्षांत झाल्यानंतर चिखलीकर यांनी खासदार या नात्याने त्यांनी केलेल्या कामांची माहिती देताना, नांदेड-बीदर रेल्वेमार्गाचा मोठा गाजावाजा केला.

रखडलेले प्रकल्प मार्गी लावा – रेल्वेमंत्री
traffic, railway stations, kalyan, Dombivli,
कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Heavy Rains Disrupt Konkan Railway Services, konkan railway, Konkan Railway Services, ST Buses Deployed for Stranded Passengers, st bus for Stranded Passengers in konkan railway,
कोकण रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना एसटीचा आधार, विशेष बस सोडण्यात आल्याने दिलासा
Kalyan railway station, water,
पावसाचे पाणी उपसण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात पाणी उपशाचे तीन पंप
Shaktipeeth Expressway, nagpur goa Shaktipeeth Expressway, Shaktipeeth Expressway facing protest, Land Acquisition in Shaktipeeth Expressway, Environmental Impact of Shaktipeeth Expressway, Financial Burden, vicharmanch article,
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग?
When will the third sea bridge from Nariman Point to Cuff Parade in Mumbai be completed
मुंबईत नरिमन पॉइंट ते कफ परेड तिसरा सागरी सेतू आता तरी मार्गी लागणार का?
Hundreds of farmers objected to the Shaktipeeth highway
शक्तीपीठ महामार्गाला शेकडो शेतकऱ्यांच्या हरकती
Leakage, Kashedi Tunnel,
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याला गळती, गळती थांबविण्यासाठी आयआयटीच्या तंत्रज्ञांची मदत

हेही वाचा >>> वाळव्यात जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम

शीख धर्मीयांसाठी नांदेड व बीदर या दोन्ही स्थानांना महत्त्व असल्यामुळे खुबा व चिखलीकर यांनी वरील रेल्वेमार्गाला प्राधान्य दिले होते; पण बीदर व नांदेडच्या मतदारांनी या दोन्ही खासदारांना पराभवाचा धक्का दिला. निवडणूक काळात खुबा यांनी जिल्ह्यातील देगलूरच्या सभेत वरील रेल्वेमार्गाचे श्रेय चिखलीकर यांना दिले; पण त्याचा मतदारांवर प्रभाव पडला नाही. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या राजवटीत भगवंत खुबा यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बीदरमध्ये काँग्रेसच्या सागर ईश्वर खांडरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तर इकडे नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही चिखलीकर यांना काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी पराभूत केले. वरील रेल्वेमार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी आपल्या हद्दीतील जमीन तसेच प्रकल्प खर्चातील ५० टक्के वाटा द्यावा, असे रेल्वे मंत्रालयाने दोन्ही राज्यांना मागील काळातच कळविले होते. त्यानुसार महाराष्ट्राने आपल्या वाट्याचा निधी देण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अधिवेशनात केली होती. पण कर्नाटक सरकारने अद्याप निधीसंदर्भात कोणतीही घोषणा केली नसल्यामुळे प्रस्तावित मार्ग अद्याप कागदोपत्रीच आहे.

नांदेड बिदर मार्गासाठी पाठपुरावा

नांदेडचे नवनिर्वाचित खासदार गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला गेले होते. या दौर्यात त्यांनी पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. पहिल्या भेटीतच त्यांनी नांदेड-बीदर रेल्वे मार्गासंबंधी कर्नाटक राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या बाबीकडे खरगे यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी चव्हाण यांना आश्वस्त केल्याचे सांगण्यात आले.