जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते. अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला का मिळत नाही? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

उदयनराजे म्हणाले, “लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. जखमी रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावे. लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करावी. अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला न्याय का मिळत नाही? शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावं.”

हेही वाचा : “एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का?” जालना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा त्रिशूळ सरकारवर हल्लाबोल

“मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले. पण, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा बघाल, असा अर्थ होत नाही. सर्व पक्षांनी विशिष्ट समाजाला घेऊन राजकारण केलं. मात्र, सर्वांत मोठ्या मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं,” अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “माय-भगिनींच्या रक्तबंबाळ शिरावर…”; मराठा मोर्चावर लाठीचार्जनंतर मनसेची प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गायकवाड कमिशनमध्ये थोड्याफार चुका होत्या. त्यात दुरूस्ती करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं. मी सर्वांना आवाहन करतो. आपल्याला शांततेन आंदोलन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पाईक आहोत. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही,” असं उदयनराजे म्हणाले.