मुबंई गोवा महामार्गावर पेण ते वडखळ दरम्यान रामवाडी पुलावर वडखळ कडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. मात्र सुदैवाने कारमध्ये बसलेल्या सर्व चारही प्रवाशांना कारला आग लागल्याचे कळताच, ते तत्काळ कारमधून बाहेर पडल्याने अनर्थ टळला या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही, सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
पेण नगरपालीका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. तर पेण पोलिसांनी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावरील वाहतुक रोखली होती.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रामवाडी परिसरातील नारिकांनी देखील मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती. परंतु त्या आगोदरच कारला मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याने यामध्ये कार पुर्णपणे जळाली.