चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची गळफास लावून आत्महत्या

खूनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कारगृहात झाली होती रवानगी

(संग्रहीत छायाचित्र)

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या उमेश दामाजी नैताम (२५) या कैद्याने बुधवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील साखरटोला या गावचा रहिवासी असलेला उमेश नैताम हा खूनाच्या प्रकरणात येथे शिक्षा भोगत होता. बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बॅरेक क्रमांक सहाच्या स्वच्छता गृहामागे या कैद्याने पांढऱ्या उपरण्याने गळफास गळफास लावून घेतल्याचे सुरक्षेत तैनात असलेल्या शिपायाला दिसले. यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यासला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासनी करून या कैद्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती तुरूंग अधिकारी आत्राम यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrapur inmate commits suicide by hanging in district central jail msr

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या