राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातले नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ रोहित पवारांना म्हणाले, “माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, तुम्हाला इतिहास ठाऊक नाही.” भुजबळ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले, “त्या रोहित पवारला सांगा, मी जानेवारी-फेब्रुवारी १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा (रोहित पवार) जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मला कोणी मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करु नका. आधी इतिहास जाणून घ्या.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या गटातील नेते आणि आमदारांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी छगन भुजबळ आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच रोहित पवार म्हणाले, भारतीय जनता पार्टीने शरद पवारांचं घर फोडलं आणि आता मजा बघत आहेत. रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, भाजपाचंही एक कुटुंब आहे. गोपीनाथ मुंडे यांचं एक कुटुंब आहे. ते कुटुंब या लोकांनी फोडलं होतं. धनंजयला तुम्ही गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापासून दूर केलं. धनंजयला दूर करण्यामागे कोण होतं? तुम्हीच होता.

हे ही वाचा >> “…तेव्हा बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं’, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्हीपण पावसात भिजतो”

शरद पवार यांचा पावसात भिजल्याचा एक फोटो त्यांच्या गटातील नेत्यांकडून शेअर केला जात आहे. त्यावर भुजबळ म्हणाले, पावसात आम्हीसुद्धा भिजत असतो. साहेबांचं वय आहे, त्यामुळे सहाजिकच लोकांमध्ये त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण होते. आम्हीही शिवसेनेत होतो तेव्हा पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत बैठका घ्यायचो. प्रचंड पावसात बैठका घ्यायचो. साहेबांचं जे चित्र आहे त्याबद्दल लोकांना प्रेम आहे.