अलिबाग: छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे राज्याच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली. ते किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान बोलत होते. सरकार अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत असते. आमदार खासदारही आपल्या मतदार संघात हजारो कोटींची कामे आणतात. मग गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी का निधी उपलब्ध होऊ शकत नाही. राज्यात छत्रपती शिवरायांचे ३५० हून अधिक गडकिल्ले आहेत. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी २ हजार कोटी सरकारने द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कर्तृत्व जगभरात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याला तमाम शिवभक्तांच्यावतीने आपल्याला निमंत्रित करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली. किल्ले रायगडच्या या प्रतिकूल परिस्थितीत लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर येत असतात. मिळेल त्या वाहनाने, सायकलवरुन, काहीजण चालत या शिवराज्याभिषेक सोहोळयाला येतात. इतके प्रेम जगात कोणाला कुठेही पहायला मिळत नाही, हे प्रेम ज्यांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन केले, त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांसाठीच पहायला मिळते.

devendra fadnavis
“काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र!
Shivaji maharaj, wagh nakh, satara,
शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – जितेंद्र डुडी
land transfer, upper district collector,
जागा हस्तांतरणासाठी कोल्हापुरात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून १० लाखाची मागणी; भाजपच्या आरोपाने खळबळ
Rajesh Shah Worli BMW hit-and-run case
Worli Hit And Run Case : राजेश शाहांना २४ तासांच्या आत दिलासा, १५ हजारांच्या तात्पुरत्या बाँडवर जामीन मंजूर
Supriya Sule, Tukaram Maharaj,
सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन, राज्य सरकारवर केली सडकून टीका
Rasta Roko movement of Shivpremi in Kolhapur
कोल्हापुरात शिवप्रेमींचे रास्ता रोको आंदोलन
Provision of 13 crore 40 lakhs for Chhatrapati Sambhaji Maharaj memorial site in Shirala
छत्रपती संभाजी महाराजांच्या शिराळ्यातील स्मृतीस्थळासाठी १३ कोटी ४० लाखाची तरतूद
Raju Shetty will take out Kaifiyat padayatra from Kagal to Kolhapur on Shahu Jayanti
राजू शेट्टी पुन्हा सक्रिय; शाहू जयंतीदिनी कागल ते कोल्हापूर कैफियत पदयात्रा काढणार

हेही वाचा : वेळ… आज तुमची, उद्या माझी येईल – चंद्रहार पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी राज्याभिषेक केला नाही, तर हे स्वराज्य जनतेसाठी निर्माण केले. अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, न्यायाची भूमिका घेण्यासाठी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असेही ते म्हणाले. या शिवराज्याभिषेक सोहळ्यास युवराज शहाजीराजे, युवराज्ञी संयोगिता राजे, खा.ओमराजे निंबाळकर, आ. रोहित पवार, माजी आ. अनिकेत तटकरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज देहूचे प्रशांत महाराज, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते.