काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर निशाणा साधला.

हेही वाचा – “…नेमकं तुम्हाला खुपतय काय?” खासदार अमोल कोल्हेंचा भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदेंना संतप्त सवाल!

“सुधांशु त्रिवेदी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं, हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये!” असं खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलं आहे.

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

हेही वाचा – “महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

याचबरोबर, “इंडियन आर्मीच्या जेवढ्या बटालियन आहेत त्या सगळ्या बटालियनची घोषवाक्य ही देवांच्या नावाने आहेत, पण फक्त मराठा बटालियनचे घोषवाक्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी सुद्धा नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशु त्रिवेदी आपण आपलं वक्तव्य मागे घ्याव आणि भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेमकी काय भूमिका आहे, ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी. महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी.” अशी मागणीही खासदार अमोल कोल्हे यांनी युट्यूबर अपलोड केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटलं आहे.

सुधांशु त्रिवेदी नेमंक काय म्हणाले? –

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.

हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले? –

“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.