सावंतवाडी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वैभववाडी ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. नारायण राणे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या मार्गाला गती देण्यासाठी विनंती केली. ज्यास रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सुरेश प्रभू आणि ममता बॅनर्जी यांच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण मंजूर झाले होते. मात्र, त्यानंतर फारसे काही झालं नाही. आता पुन्हा एकदा या रेल्वे मार्ग साठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कोकणातील उद्योगांना चालना मिळावी, मत्स्य व्यवसायाला फायदा व्हावा आणि पर्यटन वाढावे. या दृष्टीने हा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता.

वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग हा रेल्वे मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गामुळे मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडणाऱ्या कोकण रेल्वे मार्गाचे महत्त्व वाढेल. कोकणातील मासे, आंबा, काजू आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादनांची वाहतूक अधिक वेगाने होईल. यामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

खासदार नारायण राणे यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वैभववाडी ते कोल्हापूर मार्गासाठी पाठपुरावा केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्ग हा मार्ग लोहखनिज वाहतुकीसाठी फायदेशीर ठरेल. या मार्गामुळे नियोजित रेडी बंदर विकसित होण्यास मदत होईल, कारण पश्चिम महाराष्ट्र आणि बेळगाव मधून होणारी वाहतूक या बंदरासाठी फायदेशीर ठरेल. या मार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली होती, परंतु त्यानंतर कोणीही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकला.

चिपळूण कराड मार्गाचा प्रस्ताव वैभव वाडी ते कोल्हापूर प्रमाणे चिपळूण कराड या मार्गाचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. या दोन्ही मार्गांमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण सुधारेल, ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. ज्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ येईल! कोकण रेल्वे मार्गाचा विकास कोकण रेल्वे महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आला. आता कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. भारतीय रेल्वे बोर्डात कोकण रेल्वे विलिनीकरण झाल्यावर कोकण रेल्वेचा जलदगतीने विकास होईल, प्रवाशांची गैरसोय टळले. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी ते कोल्हापूर मार्ग मंजूर झाला तर भारतीय रेल्वे च्या माध्यमातून वेगाने रेल्वे मार्ग मोकळा होईल. कोकणातील जमिनी मोठ्या प्रमाणात दिल्ली, गुजरात आणि अन्य प्रदेशातील लोकांनी विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सागरी किनारा पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.