महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेसाठी एक सकारात्कम आणि दिलासा देणारी घोषणा केली आहे. राज्यातील ५२ करोनाग्रस्त रुग्णांपैकी पाच जण विषाणूमुक्त झाले आहेत. असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं.

“एक समाधानाची गोष्ट अशी आहे की राज्यामधील ज्या ५२ करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी पाच रुग्ण विषाणूमुक्त झाले आहेत. आपण जे इलाज करत आहोत, उपचार करत आहोत त्याचा सकारात्मक परिणा दिसून येत आहे. पाच रुग्ण विषाणूमुक्त असले तरी त्यानंतरही त्यांना १४ दिवस देखरेखी खाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कोणालाही डिसचार्ज देण्यात आलेला नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आपली ही धडपड जगण्यासाठी असून काही कठोर निर्णय सरकारला घ्यावे लागत आहे असंही मुख्यमंत्री यावेळेस बोलताना म्हणाले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ झाल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याचवेळी त्यांनी पाच रुग्ण बरे झाल्याचीही माहिती दिली. टोपे यांच्या याच माहितीवर मुख्यमंत्र्यांनाही शिक्कामोर्तब केलं असून त्यांनाही यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसारख्या प्रमुख शहरांमध्ये जिथे विमानतळे आहेत तिथे मोठ्या संख्येने आपलीच पर्यटनाला गेलेली लोकं परत येत आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यावर आलेल्या या संकटाशी लढा देताना मणुसकी सोडू नका असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज्यातील जनतेला केलं आहे.