गेल्या २४ तासात राज्यात ४६,१९७ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५२,०२५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत आज अडीच हजार करोना रुग्णांची वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात आज ३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९२ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६७ हजार ४३२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२ टक्के आहे. सध्या राज्यात २४ लाख २१ हजार ५०१ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ३३९१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी राज्यात १२५ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली असून हे सर्व रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्या आधी बुधवारी २१४ ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आजची संख्या जवळपास ९० ने कमी आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २१९९ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ११४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८६५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही पुणे शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी ६८७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत ५,७०८नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५,४४० जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 updates in maharashtra highest number of omicron patients in pune vsk
First published on: 20-01-2022 at 22:30 IST