Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेला संबोधित केलं. विधीमंडळ आणि मंत्रालय पत्रकार संघातर्फे देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे गतिशील असं सरकार होतं. आज आमची जी जाहिरात होती की महाराष्ट्र आता थांबणार नाही. त्याबाबत मला विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे काय त्यावर मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाने मागच्या अडीच वर्षात गती घेतली आहे. ही गती आता तशीच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही. पायाभूत क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहिल असं मी आपल्याला सांगू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

महायुतीतल्या आमच्या भूमिका बदलल्या आहेत-देवेंद्र फडणवीस

महायुतीतल्या आमच्या भूमिका बदलल्या आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, मी आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतो. २०१९ ला ७२ तासांसाठी मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. आमचे रोल बदलले असले तरीही दिशा ती राहणार आहे, गती तिच राहणार आहे. आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत आम्ही तिघांनीही अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळात आम्ही आलो तेव्हा ५० ओव्हरची मॅच होती, अजित पवार आले तेव्हा २०-२० ची मॅच झाली, आता टेस्ट मॅच आहे त्यामुळे सगळे निर्णय योग्यपणे घेऊन आणि पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला वाटचाल करायची आहे असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लाडकी बहीण योजना आम्हीच सुरुच ठेवणार आहोत. तसंच २१०० रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात त्याचा विचार आम्ही करु. आपले जे आर्थिक स्रोत चॅनलाईझ्ड झाल्यानंतरच हे करणं शक्य आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण करु त्याकरिता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधी करणार आहोत. स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे त्यात इतकंच आहे की निकषांबाहेर जर कुणी घेतलं असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत त्यावर आमचं लक्ष असेल. शेतकरी सन्मान योजना जेव्हा पंतप्रधान मोदींनी सुरु केली तेव्हा पहिल्या टप्प्यात असं कळलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनाही ते मिळालं आहे. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईतच केली जाईल

विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईच्या अधिवेशनात केली जाईल कारण नियमच असा आहे की शपथविधी झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करावी लागते. त्यामुळे ती प्रक्रिया आता सुरु होईल ७, ८ आणि ९ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये शपथविधी व्हावेत आणि त्यानंतर ९ तारखेला अध्यक्षांची निवड करावी आणि राज्यपालांनी अभिभाषण करावं. मंत्रिमंडळाच्या संदर्भात इतकंच सांगेन की जवळपास आमची प्रक्रिया झाली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader